inhaler pump
inhaler pump 
पुणे

दम्याच्या आजारावर ‘इन्हेलर पंप’ रामबाण

सकाळवृत्तसेवा

पुणे - दम्याच्या (अस्थमा) आजारासाठी ‘इन्हेलर पंप’ वापरणे गोळ्यांच्या तुलनेत अधिक सोपे, जलद आणि सुरक्षित असल्याचे वारंवार छातीरोगतज्ज्ञांकडून सांगण्यात येते. इन्हेलर यंत्रणेतून औषध थेट फुफ्फुसांमध्ये जात असल्याने तीन ते चार मिनिटांमध्ये याचा परिणाम होत असल्याचे दिसते; परंतु इन्हेलरचा वापर योग्य पद्धतीने न केल्यास हा आजार बरा होण्यास वेळ लागतो. सुमारे ९० टक्के दम्याचे रुग्ण इन्हेलरचा योग्य पद्धतीने वापर करत नसल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुण्यातील ‘चेस्ट रिसर्च फाउंडेशन’ व ‘सेंट्रल हेल्थ सर्व्हिस’तर्फे यावर अभ्यास करण्यात आला. यामध्ये डॉ. नागेश धाडगे, डॉ. मधुरागौरी शेवडे, डॉ. संदीप साळवी, डॉ. गोविंदा नरके, डॉ. निशा काळे, डॉ. धनंजय पाठक, डॉ. मोनिका बारणे आणि डॉ. सपना एम. यांचा सहभाग होता. त्यांच्या या अभ्यासाबाबतची माहिती ‘नेचर’ या संशोधन नियतकालिकेमध्ये प्रकाशित करण्यात आली आहे. 

दम्याचा रुग्णांना रुग्णालयात इन्हेलरच्या वापराची माहिती दिली जाते; परंतु घरी आल्यानंतर अनेक रुग्णांना याचा वापर कसा करावा, हे लक्षात येत नसल्याने ते चुकीच्या पद्धतीने ते वापरतात. परिणामी ३० टक्‍क्‍यांऐवजी केवळ २ टक्के औषध फुफ्फुसामध्ये जाते आणि त्याचा उपयोग होत नाही.

असा झाला अभ्यास

  • दम्याचे नवीन रुग्णांना इन्हेलर पंप कसा वापरावा याचे प्रशिक्षण रुग्णालयात देण्यात आले
  • सुमारे एक महिना या रुग्णांचे निरीक्षण करण्यात आले
  • त्यासाठी प्रत्येक रुग्णांचे इन्हेलर वापरतानाचे व्हिडिओ त्यांच्या नातेवाइकांकडून मागविण्यात आले
  • व्हिडिओमधून इन्हेलरच्या वापराबाबतची पाहणी करण्यात आली

समस्येवरील उपाय

  • गोळ्यांऐवजी इन्हेलर कसे सुरक्षित व उपयुक्त आहे, याबाबत लोकांमध्ये जनजागृती करणे
  • टेलिमेडिसीनच्या माध्यमातून रुग्णांना इन्हेलर अचूकपणे कसा वापरावा, यासाठी सतत प्रशिक्षण देणे
  • यासाठी स्वतंत्रपणे तज्ज्ञ लोकांची निवड करून प्रशिक्षण मंडळ तयार करणे
  • नेमण्यात आलेल्या लोकांकडून दररोज निरीक्षण करणे

दम्याचा आजार हा सर्व वयोगटातील लोकांना होतो. सध्या पुण्यात अंदाजे तीन लाख असे रुग्ण आहेत. जागतिक स्तरावर या आजारामुळे मृत्यू पावणाऱ्यांमध्ये ४३.४ टक्के भारतीय नागरिक असल्याचे ‘ग्लोबल बर्डन ऑफ अस्थमा’ या अहवालातून समोर आले आहे. 
- डॉ. संदीप साळवे, छातीरोगतज्ज्ञ

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT