संतोष जगताप खून प्रकरणातील जखमी अंगरक्षकाचा उपचारादरम्यान मृत्यू sakal
पुणे

संतोष जगताप खून प्रकरणातील जखमी अंगरक्षकाचा उपचारादरम्यान मृत्यू

गोळीबाराच्या घटनेतील मृतांची संख्या आता तीनवर पोहचली

सकाळ वृत्तसेवा

उरुळी कांचन : वाळू व्यावसायिक संतोष जगताप याचा अंगरक्षक मोनुसिंग (वय -35) यांचा उपचारादरम्यान बुधवारी (ता.10) पहाटेच्या सुमारास मुंबईत मृत्यू झाला.

उरुळी कांचन (ता. हवेली) येथे 22 ऑक्टोंबर रोजी संतोष संपत जगताप (रा. राहू, ता. दोंड) यांच्यावर गोळ्या झाडून त्याचा खून करण्यात आला होता. तर जगतापच्या अंगरक्षकाकडून प्रतिउत्तरादाखल केलेल्या गोळीबारात स्वागत खैरे हा जागीच ठार झाला होता.

या हल्ल्यात जगतापचे अंगरक्षक शैलेंद्रसिंग व मोनुसिंग (वय -35) हे गंभीर जखमी झाले होते. त्यातील मोनू सिंगवर मुंबईत उपचार सुरु होते. मात्र आज उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. गोळीबाराच्या घटनेतील मृतांची संख्या आता तीनवर पोहचली आहे.

दरम्यान, संतोष जगताप खून प्रकरणातील पवन गोरख मिसाळ (वय 29 वर्षे) आणि महादेव बाळासाहेब आदलिंगे (वय 26 दोघेही रा. उरूळीकांचन ता. हवेली) तसेच मुख्य सुत्रधार उमेश सोपान सोनवणे (वय 34 वर्षे, रा.राहु ता. दौंड जि. पुणे) यांना अटक झाली आहे. तर त्यांना गावठी पिस्तुल पुरविणारे अभिजीत सोपान यादव (रा मेडद, ता. बारामती) आणि आकाश जगन्नाथ वाघमोडे (रा. कुर्डवाडी ता. म्हाडा जि.सोलापुर) या दोघांनाही लोणी काळभोर पोलिसांनी गजाआड केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam Water Storage 100 TMC : 'कृष्णा'काठी जलसंकट टळले! 'कोयने'त 100, तर 'चांदोली'त 34 टीएमसी साठा; शेतीसाठी पुरेसे पाणी

Asia Cup 2026: दीप्ती शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड अन् भारतीय संघाची विजयी सुरुवात! प्रतिस्पर्ध्यांना ६५ धावांवर केलं ऑलआऊट

Nepal Flood: नेपाळच्या मदतीला भारत धावला! महापुरामुळे वीज संकट; मागणीनुसार अतिरिक्त वीजपुरवठा करणार

Asia Cup 2026: बलाढ्य टीम इंडिया शफालीच्या फिफ्टीनंतरही थायलंडसमोर ढासळली; किती धावांचे ठेवले टार्गेट?

Abhijeet Dipke: विजेता दहिया यांची CJPमध्ये एन्ट्री होणार? अभिजीत दिपकेंनी दिलं मोठं उत्तर; स्पष्ट केली भूमिका

SCROLL FOR NEXT