The injustice to OBC from BJP  
पुणे

खऱ्या ओबीसींवर भाजपकडून अन्याय 

संदीप घिसे

पिंपरी (पुणे) - महापालिका निवडणुकीत ओबीसींनी भाजपला भरभरून मतदान केले. मात्र आता पदांचे वाटप करताना खऱ्या ओबीसींवर अन्याय केला जात असून कुणबी जात प्रमाणपत्रावर निवडून आलेल्यांना संधी दिली जात असल्याचा आरोप बारा बलुतेदार महासंघ आणि पिंपरी चिंचवड ओबीसी संघर्ष समितीने केला आहे. 

बारा बलुतेदार महासंघ आणि पिंपरी चिंचवड ओबीसी संघर्ष समिती यांच्यावतीने पिंपरीत पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्यावेळी प्रताप गुरव, प्रदीप पवार, विशाल जाधव, आनंदा कुदळे यांच्यासह अनेकजण उपस्थित होते. 

कुणबी जात प्रमाणपत्रावर निवडून आलेल्या महापौर नितीन काळजे यांच्या विरोधात घनश्‍याम खेडकर यांनी न्यायालयात आव्हान दिले आहे. तर दुसरीकडे महापौर पदाच्या शर्यतीतील उमेदवार शत्रुघ्न काटे यांच्याही निवडीला कैलास कुंजीर यांनी आव्हान दिले आहे. त्याचे जात प्रमाणपत्र खोटे असल्याचे त्यांच्या विरोधकांचे म्हणणे आहे. महापौर पदाचे आरक्षण हे इतर मागासवर्गीयांसाठी राखीव आहे. यामुळे हे पद मूळ ओबीसी असलेल्या नगरसेवकांनाच देण्यात यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. जर खऱ्या ओबीसींवर अन्याय केल्यास आगामी निवडणुकीत ओबीसी समाज भाजपला घरी बसविल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही या पत्रकार परिषदेत देण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Rally: शेअर बाजारात तुफान तेजी! गुंतवणूकदारांची चांदी; सेन्सेक्स १,१०९ अंकांनी वधारला

Pregnant journalist allegation: गर्भवती महिला पत्रकाराला राहुल गांधींनी धक्का दिल्याचा आरोप; 'एक्स-रे'वरून काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न

Latest Marathi News Live Update: ज्ञानेश कुमार हे माफिया आहेत- संजय राऊत

जैन आहे 'सनई चौघडे' मधील अभिनेत्री; घरी नवरात्री कशी साजरी होते हे सांगताना म्हणाली- आम्ही नऊ दिवस...

WTC Points Table: ऑस्ट्रेलियाच्या विजयाने भारताच्या WTC Final खेळण्याच्या स्वप्नाचा चुराडा? जाणून घ्या समीकरण

SCROLL FOR NEXT