inmates of state prisons now get hot water for bathing pune Sakal
पुणे

Pune News : कैद्यांना आता अंघोळीसाठी गरम पाणी

राज्यातील कारागृहातील कैद्यांना आता अंघोळीसाठी गरम पाणी मिळणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्यातील कारागृहातील कैद्यांना आता अंघोळीसाठी गरम पाणी मिळणार आहे. तसेच, कैद्यांना त्यांच्या नातेवाईकांसोबत संवाद साधण्यासाठी टेलिफोन कॉइन बॉक्सची संख्या वाढविण्याचा निर्णय कारागृह प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. याबाबत अतिरिक्त पोलिस महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी आदेश दिले आहेत.

महाराष्ट्रातील कारागृहे ही सुधारगृहे व्हावीत, यासाठी अतिरिक्त महासंचालक गुप्ता यांनी सर्व कारागृहांच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली होती. त्यामध्ये कैद्यांना त्यांच्या अडचणी जाणून नियमानुसार आवश्यक सोयीसुविधा पुरविण्याच्या सूचना कारागृह अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यानुसार कारागृह प्रशासनाकडून आता कैद्यांना अंघोळीसाठी गरम पाणी, नातेवाईकांशी बोलण्यासाठी जादा टेलिफोनची सुविधा उपलब्ध होणार आहे.

राज्यात सध्या कडाक्याची थंडी आहे. त्यामुळे कैद्यांनी त्यांना अंघोळीसाठी गरम पाणी तसेच, झोपण्यासाठी चादर, उशी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्यानुसार कारागृहात तयार होणाऱ्या या वस्तू आवश्यकतेनुसार द्याव्यात.

कारागृहातील कैद्यांना भेटण्यासाठी येणाऱ्या नातेवाईकांची गर्दी होत असते. त्यासाठी कैद्यांना भेटण्यासाठी असलेल्या मुलाखतीच्या खिडक्या वाढविण्यात याव्यात. तसेच, नातेवाइकांसोबत संवाद साधण्यासाठी टेलिफोन कॉइन बॉक्सचीही संख्या वाढवावी, अशा सूचना अतिरिक्त महासंचालक गुप्ता यांनी दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT