पुणे

मलकापूर आदर्श शेतकऱ्यांचा व पशुपालकांचा सत्कार

CD

नवीन प्रयोगाद्वारे शेती करा फायदेशीर

अशोकराव थोरात; प्रगतशील शेतकरी, पशुपालकांना पुरस्कार


मलकापूर, ता. २३ : शेतीत विविध प्रकारचे संशोधन होणे, नवनवीन प्रयोग करून फायदेशीर शेती करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन शेतीमित्र अशोकराव थोरात केले.

येथील श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या आदर्श ज्युनियर कॉलेजमध्ये (कै.) प्रा. पांडुरंग पुजारी यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रगतशील शेतकरी व आदर्श पशुपालक शेतकऱ्यांचा सत्कार, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य प्रदर्शन व पुरस्काराचे वितरण झाले. त्या वेळी ते बोलत होते. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे माजी प्रा. एम. एस. जाधव अध्यक्षस्थानी होते. महात्मा फुले कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. इंदिरा घोनमोडे, कृष्णा कारखान्याचे ऊस विकास अधिकारी पंकज पाटील, कुसुम पुजारी, अजित थोरात, विनोद तोडकर, डॉ. दिलीप सुतार, भास्करराव पाटील, तुळशीराम शिर्के, वसंत चव्हाण, संजय थोरात, आर. आर. पाटील, सुधाकर शिंदे, संजय तडाखे, मुख्याध्यापक ए. बी. थोरात, उपमुख्याध्यापक एम. पी. फराळे, पर्यवेक्षक जे. बी. पाटील, विविध शाखांचे मुख्याध्यापक, विभाग प्रमुख शीला पाटील उपस्थित होते.

डॉ. घोनमोडे, पंकज पाटील यांनी मार्गदर्शन केले. श्री. जाधव यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता, संशोधनवृत्तीबाबत मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांच्या हस्तलिखितांचे प्रकाशन झाले. महेश सावंत यांनी प्रास्ताविक केले. एस. ए. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. ए. बी. थोरात यांनी आभार मानले.
......
चौकट
.........

यांचा झाला गाैरव
जिद्दी, कष्टकरी शेतकरी व आदर्श पशुपालकांचा सपत्नीक सन्मानपत्र, इलेक्ट्रिक किट, मानाचा फेटा देऊन सन्मानित केले. त्यात विठ्ठल मुळगावकर, ज्ञानेश्वर जमाले, सिद्धार्थ पाटील, हणमंत तडाखे, जयवंत पाटील, चारुदत्त पाटील, हणमंत पवार, अजय पाटील, मनोहर पाटील, बजरंग ढेबे, मंगेश गरुड, भीमराव पाटील, विनोद तोडकर, हणमंत जिजाबा पवार या प्रगतशील शेतकऱ्यांचा व आदर्श पशुपालकांचा सत्कार झाला.
.....

A01231
मलकापूर : प्रगतशील शेतकरी, आदर्श पशुपालकांच्या सत्कारप्रसंगी मान्यवर.
.............................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Employees DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी! महागाई भत्ता (DA) तब्बल 58% वर; महाराष्ट्राबाबत काय निर्णय?

चेहऱ्यावरचे बारीक केस काढायचे आहेत? फक्त ‘ही’ घरगुती ट्रिक करा अन् पाहा फरक

T20 WC, IND vs ENG: भारत - इंग्लंड सामन्यादरम्यान पावसाचा अडथळा येणार? कसे असेल वातावरण आणि फ्रीमध्ये कसा पाहाणार सामना?

तोतया पोलिसांना बसणार लगाम! अधिकारी, अंमलदारांना एनएफसी-क्यूआरयुक्त नवी ओळखपत्रे मिळणार

Latest Marathi News Live Update : धुळ्यातील साक्री येथील हनुमंतपाडा येथे पुतणी सोबत बोलण्याच्या वादातून झालेल्या मारहाणीत एकाचा दुर्दैवी मृत्यू

SCROLL FOR NEXT