पुणे

खड्डेमुक्त शहरासाठी ‘इनरोड्‌स’ ॲप!

सलील उरुणकर

‘शहर खड्डेमुक्त करू, शंभर कोटी रुपयांची तरतूद करू,’ अशी आश्‍वासने प्रत्येक राजकीय पक्ष सध्या देत आहे; मात्र, खरेच शहरातील रस्त्यांवर किती खड्डे आहेत, त्यांची तीव्रता काय आहे आणि ते नेमके कोठे आहेत, याचा कोणताही साधार तपशील उपलब्ध नाही. आता हा तपशील लोकसहभागातून (क्राउडसोर्सिंग) निर्माण होऊ शकेल असे ॲप आले आहे. अजय वालगुडे आणि प्रसाद वाटवे या दोन तरुणांनी ‘इनरोड्‌स’ हे मोबाईल ॲप्लिकेशन आधारित तंत्रज्ञान विकसित केले आहे.

पुण्यातला कर्वे रस्ता किंवा सिंहगड रस्ता किंवा अन्य कोणत्याही रस्त्यावर किती खड्डे आहेत, त्यांची तीव्रता किती आहे, त्यामुळे तुम्हाला व तुमच्या वाहनाला कसे व किती नुकसान होत आहे, अशी सगळी अचूक माहिती उपलब्ध झाल्यास? ‘स्मार्ट सिटी’ होण्याकडे वाटचाल करत असलेल्या पुण्यासह अन्य शहरांमधील असा सर्व तपशील जर ‘गुगल मॅप्स’वर सर्वांना दिसला तर? आणि विश्‍वासार्हता जपून ही सर्व माहिती लोकसहभागातून, म्हणजे ‘क्राउडसोर्सिंग’मार्फत संकलित केली गेली तर...
होय, अशी सर्व माहिती आता संकलित होण्यास सुरवात झाली आहे. या सर्व माहितीचे विश्‍लेषण करून त्याचा अहवाल केंद्र, राज्य सरकारांपासून स्थानिक महापालिकांना देण्याची व्यवस्थाही झाली आहे.

‘इनरोड्‌स’ या मोबाईल ॲप्लिकेशनच्या मदतीने कोणताही सर्वसामान्य माणूस या उपक्रमात सहभागी होऊ शकतो. ‘इनरोड्‌स’चे निर्माते अजय वालगुडे हे मूळचे पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्‍यातील. वर्षातील ३६५ पैकी २०० दिवस जगभर भ्रमंती केल्यानंतर ते गावाकडे येत, तेव्हा त्यांना खराब रस्त्यांविषयी काहीतरी करण्याची इच्छा होत असे. बराच विचार केल्यानंतर त्यांनी सहकारी प्रसाद वाटवे यांच्या मदतीने ‘इनरोड्‌स’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविली.

अजय म्हणाले, ‘‘खड्ड्यांची व्याख्या काय, त्याचा आकार व तीव्रता कशी मोजायची, वाहनाचा किमान वेग कसा समजणार, संख्या कशी समजणार याबाबत मोबाईलमध्ये असलेल्या ॲक्‍सलरोमीटर आणि गायरोमीटरच्या मदतीने नोंदी घेण्याची प्रक्रिया निश्‍चित केली. गुरुत्वाकर्षण बलानुसार खड्ड्याची तीव्रता समजते. वेगनियंत्रकामुळे बसलेल्या हादऱ्याची गणना खड्डा म्हणून होऊ नये यासाठीही खबरदारी घेतली; तसेच हे ॲप वापरताना यूजरला फक्त दोनच वेळा, प्रवासाला सुरवात करताना आणि प्रवास संपल्यावर, क्‍लिक करावे लागेल याचाही आम्ही विचार केला.’’

प्रसाद वाटवे म्हणाले, ‘‘सरकारने खड्डेदुरुस्तीसाठी किती निधीची तरतूद करावी, यासाठी हे ॲप उपयुक्त ठरू शकते. प्रसारमाध्यमांनाही खड्ड्यांविषयी वार्तांकन करताना अचूक माहिती मिळू शकते. एखादा रस्ता चांगला आहे की खराब, याचे प्रमाणपत्र महापालिका अधिकारी किंवा ठेकेदाराकडून घेण्याऐवजी सामान्य नागरिकांकडून मिळालेल्या अभिप्रायाच्या आधारे मिळू शकते.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Crime News : दिल्लीमध्ये 15 टन बनावट मसाला जप्त; लाकडाची पावडर अन् अ‍ॅसिडचा वापर

Aavesham: 30 कोटींचं बजेट अन् कमाई 140 कोटी; ब्लॉकबस्टर ठरला फहाद फासिलचा आवेशम, ओटीटीवर कधी होणार रिलीज?

Karan Johar : "आई सोबत टीव्ही पाहत होतो पण.. " करण जोहर भडकला, कॉमेडीयनने मागितली माफी; कोण आहे केतन सिंह ?

Gadchiroli: स्फोटकांनी भरलेले 6 प्रेशर कुकर अन् डिटोनेटर नष्ट...मातीच्या खाणींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या जवानांची कारवाई

Sunil Gavaskar Video : गावसकरांचा जुना VIDEO व्हायरल, रनरेटवरून विराटवर टीका केल्यानंतर झाले ट्रोल

SCROLL FOR NEXT