पुणे

असंवेदनशील रुग्णालय अन्‌ हतबल नातेवाईक

संदीप घिसे

पिंपरी : ह्रदयविकाराचा झटका आलेल्या मजुरास खासगी रुग्णालयात नेताना मृत्यू झाला. मात्र आम्ही रुग्णावर उपचार केले असून त्याचे बिल भरल्याशिवाय मृतदेह ताब्यात देणार नसल्याचे सांगितले. मृतदेह ताब्यात द्यावा यासाठी रुग्णालय प्रशासनाशी गयावया करताना त्याची पत्नी बेशुद्ध पडली. तरीही रुग्णालयास आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. अखेर त्याच्या मित्र मजुरांनी पैसे जमा करीत दीड हजार रुपये जमविल्यावर रुग्णालयाने मृतदेह ताब्यात दिला. या घटनेतून रुग्णालयाची असंवेदनशीलता पुन्हा एकदा समोर आली आहे.

मनोहर प्रभू सर्यूवंशी (वय 35, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी. मूळगाव मु. भाटसांगवी, जि.बिदर, राज्य कर्नाटक) असे मृत्युमुखी पडलेल्या मजुराचे नाव आहे. सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास त्यांना छातीत दुखू लागल्याने नातेवाइकांनी जवळच्या खासगी रुग्णालयात नेले. मात्र हा प्रकार ह्रदयविकाराचा असल्याने लवकर मोठ्या खासगी रुग्णालयात किंवा वायसीएम हॉस्पिटलला घेऊन जा, असा सल्ला दिला. त्यामुळे नातेवाइकांनी मोशीतील जवळच्या खासगी रुग्णालयात नेण्यास सुरवात केली. मात्र वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. 

डॉक्‍टर काहीतरी प्रयत्न करतील, या आशेने नातेवाइकांनी मनोहर यांना सव्वानऊ वाजताच्या सुमारास रुग्णालयात दाखल केले. डॉक्‍टरांनीही त्यांना सतराशे रुपयांची औषधे आणायला सांगितली. 9.40 वाजता डॉक्‍टरांनी अधिकृतरीत्या मनोहर त्यांनना मयत घोषित केले व पुढील कार्यवाहीकरिता भोसरी पोलिसांना कळविले. पोलिस आल्यावरही रुग्णालय प्रशासनाने उपचाराचे तीन हजार 900 रुपये भरल्याशिवाय मृतदेह ताब्यात देणार नसल्याचे स्पष्ट केले.

यामुळे मजुराचे नातेवाईक यांनी पैसे भरण्यास असमर्थता दर्शविली. मनोहर यांची पत्नी ज्योती यांनी रुग्णालय प्रशासनाच्यासमोर हात जोडून विनंती केली. 'आता माझ्याकडे पैसे नाहीत. मी तुमचे सर्व पैसे देईल. मात्र आत्ता मृतदेह ताब्यात द्या.' तरीदेखील रुग्णालय आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. रुग्णालय पतीचा मृतदेह ताब्यात देत नसल्याचा ताण असहाय्य झाल्याने ज्योती यांना चक्‍कर आली अन्‌ त्या खाली कोसळल्या. अखेर मनोहर यांच्या मजूर मित्रांनी पै-पैसा जमवून दीड हजार रुपये जमा केले. रुग्णालयास हात जोडून विनंती केल्यावर अखेर प्रशासनाने ते पैसे घेऊन मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला.

मनोहर यांचा मृतदेह सायंकाळनंतर गावी नेण्यात येणार होता. मात्र शवागृहातील शीतगृहात ठेवण्यासाठी नातेवाइकांकडे पैसे नव्हते. यामुळे उशिरा शवविच्छेदन करावे, अशी विनंती नातेवाइकांनी पोलिसांना केली. तरीदेखील रुग्णवाहिकेचे पैसे कसे देणार असा प्रश्‍न त्यांच्यासमोर निर्माण झाला. अखेर गावी पैशाची व्यवस्था करण्यास सांगितल्याने हा प्रश्‍न तात्पुरता सुटला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonia Gandhi Babri Masjid : बाबरी मशीद पाडल्यावर सोनिया गांधींना कोसळलेले रडू; भाजप नेते म्हणाले- काँग्रेसच्या हृदयात आजही बाबर जिवंत

IAS बनण्याचं स्वप्न भंगलं, KBCमध्येही अपयश; अखेर शॉर्टकट म्हणून गुन्हेगारीचा मार्ग निवडला, बीटेक पदवीधर तरुणाला अटक

Indian Air Force : तेरा हजार फुटांवरील धावपट्टीवर ‘आयएल-७६’ हवाई दलाची ऐतिहासिक कामगिरी; चीनबरोबरील ‘एलएसी’जवळ लँडिंग

Mohammed Shami शिवाय भारतीय वेगवान गोलंदाजी अपूर्ण, तो न्यूझीलंड दौऱ्यात हवा होता, रवी शास्त्री स्पष्टच बोलले

Latest Marathi News Live Update: अभिनेते रजनीकांत यांनी चेन्नईतील निवासस्थानाबाहेर चाहत्यांची घेतली भेट

SCROLL FOR NEXT