पुणे

व्यावसायिकाकडून लाच घेताना फौजदारास अटक

सकाळवृत्तसेवा

पुणे - कुल्फी व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी व्यावसायिकाकडून दहा हजार रुपयांची लाच घेण्याच्या आरोपावरून बिबवेवाडी पोलिस ठाण्यातील फौजदारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अप्पर इंदिरानगर पोलिस चौकीतच रविवारी दुपारी रंगेहात पकडले. 

फौजदार भिकोबा पांडुरंग देवकाते (रा. स्वारगेट पोलिस वसाहत) यांना लाचलुचत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. संबंधित कुल्फी व्यावसायिक अप्पर इंदिरानगर परिसरात व्यवसाय करतो. हा व्यवसाय अनधिकृत असून, कारवाई करावी लागेल, असे सांगत देवकाते यांनी २० हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. तडजोड होऊन दहा हजार रुपये देण्याचे ठरले. कुल्फी व्यावसायिकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला.त्यानुसार व्यावसायिकाकडून दहा हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अर्चना दौंडकर, चंद्रकांत चौधरी यांच्या पथकाने देवकाते यांना अटक केली.

व्हॉट्‌सॲपवरही द्या तक्रार ! 
शासकीय कामासाठी कोणत्याही अधिकारी अथवा कर्मचाऱ्याने लाच मागितली, तर नागरिकांनी ०२०-२६१२२१३४ किंवा २६१३२८०२ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. ७८७५३३३३३३ या मोबाईल क्रमांकावर व्हॉट्‌सॲपद्वारेही नागरिक तक्रार देऊ शकतात, असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक संदीप दिवाण यांनी स्पष्ट केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; पंजाबची गळती सुरू जवळपास निम्मा संघ गारद

Baramati Lok Sabha Election : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT