Sleep Sakal
पुणे

झोपण्यापूर्वी मोबाईल वापरण्याने निद्रानाश, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थचा अहवाल

अपूर्ण झोप हृदयरोग, रक्तदाब आणि मधुमेहासारख्या गंभीर आजारांना निमंत्रण देते. मोबाईलचा वाढता वापर हे झोप अपूर्ण होण्यामागचे महत्त्वाचे कारण आहे.

प्रशांत पाटील

अपूर्ण झोप हृदयरोग, रक्तदाब आणि मधुमेहासारख्या गंभीर आजारांना निमंत्रण देते. मोबाईलचा वाढता वापर हे झोप अपूर्ण होण्यामागचे महत्त्वाचे कारण आहे.

- प्रतीक्षा जाधव

पुणे - अपूर्ण झोप (Sleep) हृदयरोग, रक्तदाब आणि मधुमेहासारख्या गंभीर आजारांना (Sickness) निमंत्रण देते. मोबाईलचा (Mobile) वाढता वापर हे झोप अपूर्ण होण्यामागचे महत्त्वाचे कारण आहे. ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ ॲण्ड न्युरो सायन्स’च्या (NIMHANS) सर्वेक्षणात (Survey) ही बाब समोर आली. या सर्व्हेनुसार झोपेपूर्वी मोबाईलचा जास्त वापर केल्यास थकवा आणि निद्रानाश यांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याचे दिसून आले. तर झोपेपूर्वी जे मोबाईल वापरतात, त्यांच्यापैकी झोपेविषयी अनेक तक्रारी असलेल्यांचे प्रमाण ७२.४ टक्के इतके असल्याचेही समोर आले आहे.

‘आपल्या दिनचर्येवर झोपेचा खूप प्रभाव असतो. कोरोनाकाळात झोप न लागणे, अपूर्ण होणे अशा तक्रारींमध्ये वाढ झाली. या काळात ऑनलाइन शिक्षण, वर्क फ्रॉम होममुळे तरुणांमध्ये मोबाईलचा वापर मोठ्याप्रमाणात झाला. त्यामुळे विविध आजार आढळून येत आहेत. माझ्याकडे याबाबतच्या तक्रारी घेऊन तरुण आणि पालक येतात.’ असे स्नुजफिटचे संस्थापक डॉ. राम पाझहायन्नुर यांनी सांगितले.

अपुऱ्या झोपेचे परिणाम

  • सतत डोळ्यातून पाणी येणे

  • डोळ्यांखाली सूज येणे

  • डोळ्यांखालची त्वचा सुरकुतणे

  • चिडचिड होणे

निद्रानाशातून बाहेर पडण्यासाठी उपाययोजना

१. दहा मिनिटे ध्यान करा

२. झोपण्याच्या ३० मिनिटे आधी मोबाईल, कम्प्युटर, टीव्ही पाहू नका

३. संगीत ऐका

४. झोपण्यापूर्वी चॉकलेट, चहा, कॉफी टाळा

५. कामाची वेळ, झोपेचे वेळापत्रक निश्‍चित करा

६. तेलाने हात, पायाची मसाज करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अकरावी प्रवेशाची उद्या पहिली गुणवत्ता यादी! विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर येणार मेसेज; १२.५१ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी, प्रत्येक फेरीपूर्वी नावनोंदणीची संधी

Vaibhav Sooryavanshi ओपनर, सोबतीला कोण? IPL 2026 मधील अनकॅप्ड खेळाडूंची प्लेइंग इलेव्हन, तगड्या संघाला देईल टक्कर...

Latest Marathi News Live Update : पानशेत धरण कालव्यात बुडून युवकाचा दुर्दैवी मृत्यू; हवेली आपत्ती व्यवस्थापन टीमची तत्काळ मदत

Fishing Ban: मच्छीमारांसाठी महत्त्वाची बातमी! महाराष्ट्रात मासेमारी बंद राहणार; महायुती सरकारचा मोठा निर्णय

Loni Kalbhor Crime : बारावीच्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर अल्पवयीन मुलाकडून वारंवार अत्याचार; मुलाविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT