shop.jpg 
पुणे

लोहगावातील 'त्या' दुकानाची तपासणी करण्यात आली कारण....

सकाळवृत्तसेवा

विश्रांतवाडी (पुणे) : लोहगाव येथील स्वामी समर्थ महिला बचत गटांतर्गत चालविणाऱ्या जाणाऱ्या स्वस्त धान्य दुकानाबाबत नागरिकांच्या तक्रारी आल्यानंतर भरारी पथकाने दुकानाची तपासणी केली. तपासणीवेळी दुकानात धान्य कमी आढळून आले आहे. याशिवाय दुकानाविषयी नागरिकांचेदेखील जबाब नोंदवून घेण्यात आले. या कारवाईमुळे रेशनच्या धान्यवाटपात होणा-या  गैरप्रकारांना आळा बसेल, अशी आशा आहे. लोहगावातील मोझे आळीत स्वामी समर्थ महिला बचत गट अंतर्गत स्वस्त धान्य दुकान आहे. या स्वस्त धान्य दुकानाविषयी लोहगावमधील नागरिकांच्या अनेक तक्रारी होत्या. वेळेवर दुकान उघडत नाही. धान्य कमी दिले जाते. मोफत मिळणारा तांदूळ दिला जात नाही.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

अन्नसुरक्षा योजने अंतर्गत लाभार्थ्यांना मिळणारी डाळ वाटप केली जात नाही. नागरिकांना उद्धट वागणूक मिळतात अशा अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. सुनील खांदवे, संदीप मोझे, सोमनाथ खांदवे, संतोष खांदवे, बंटी जंगम, रावसाहेब राखपसरे यांनी स्वस्त धान्य दुकानांच्या तक्रारीबाबत समिती गठित करून रेशनधारकांच्या तक्रारी प्राप्त करून घेतल्या होत्या. तक्रारी आल्यानंतर पुरवठा निरीक्षक रविकिरण शेटे, नगररचना विभागाचे अधिकारी घोडके यांच्या भरारी पथकाने स्वस्त धान्य दुकानाची अचानक तपासणी केली. या तपासणीत धान्य कमी आढळून आले. याशिवाय सर्वसामान्य नागरिकांचे दुकानाविषयी जबाब नोंदवून घेतले.

यावेळी नागरिकांनीदेखील भरारी पथकाला तक्रारी सांगितल्या आहेत. भरारी पथक सर्व अहवाल तयार करून एफडीओकडे कारवाईसाठी ठेवणार असल्याची माहिती ई परिमंडळ विभागाचे अधिकारी प्रशांत खताळ यांनी दिली. आता या दुकानावर काय कारवाई होणार याकडे लोहगावकारांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi : वैभवसाठी संजू सॅमसनला बळीचा बकरा का बनवताय? माजी खेळाडूचा संतापजनक सवाल...

ऑफिसमध्ये एकाला थंडी तर दुसऱ्याला घाम का येतो? वाचा सेंट्रल एसीच्या या परिस्थितीमागचं खरं कारण

Ladki Bahin Yojana Update : लाडक्या बहिणींनो लक्ष द्या! तुमच्या बँक खात्यात 1500 ऐवजी जमा होणार 3,000 रुपये? पण 'या' 80 लाख महिलांना बसू शकतो फटका!

आगीत काय जळालं ते राखेलाच माहीत! ‘बोल बोल राणी’च्या ट्रेलरवर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट, चित्रपटात सईच्या तीन भूमिका?

Latest Marathi News Live Update : सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या भीमाशंकर पट्ट्यात अजूनही मुसळधार पावसाची प्रतीक्षा कायम

SCROLL FOR NEXT