Pramila-Bambale
Pramila-Bambale 
पुणे

कृतिशीलतेचे उत्तम उदाहरण

डॉ. रामकृष्ण पेढेकर

आता स्थैर्य आले असताना रुग्णांसाठी, समाजातील वेगवेगळ्या घटकांसाठी, संघटनेसाठी आणि विशेषतः आदिवासी बांधवांसाठी आपला बहुमोल वेळ खर्च करीत, रात्रीचा दिवस करून, कार्यरत राहणाऱ्या डॉ. प्रमिला बांबळे म्हणजे कृतिशीलतेचे उत्तम उदाहरण आहे.

आई-वडील शिक्षक असल्याने घरातच शिक्षणाचे बाळकडू मिळाले. राजगुरुनगरच्या महात्मा गांधी विद्यालयात शालेय शिक्षण आणि बी. जे. मेडिकल कॉलेजला वैद्यकीय शिक्षण पार पडले. पुढे बालआरोग्य विषयात डिप्लोमा केला. राजगुरुनगरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून नोकरीत रुजू झाल्या. त्याकाळात कुपोषित बालकांच्या समस्येवर काम करण्यासाठी पेठ, पाईट, कुडा या आरोग्य केंद्रात दोन वर्षे जात होत्या.

यथावकाश डॉ. प्रमिला, डॉ. दिलीप बांबळे यांच्याशी विवाहबद्ध झाल्या. फक्त दवाखाना चालवत बसण्याचे काम न करता, हॉस्पिटल उभारणीचे स्वप्न त्यांनी पाहिले आणि प्रत्यक्षातही आणले. तो काळ संघर्षाचा होता. लहान मुले, कुटुंब आणि व्यवसाय, अशा सर्व आघाड्यांवर लढावे लागत होते. हॉस्पिटल उभे राहिले, तरी रुग्णांना अधिकाधिक सुविधा मिळाव्यात म्हणून त्यात सतत सुधारणा करीत राहिल्याने एका अर्थाने उभारणीचे काम अजूनही सुरूच आहे. नुकतेच नूतनीकरण करून आयसीयू, ट्रॉमा केअर युनिट, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, सोनोग्राफी, टू डी इको, डिजिटल एक्‍सरे, सिटी स्कॅन, गॅस्ट्रोस्कोपी, लॅप्रोस्कॉपीक सर्जरी, पल्स-ऑक्‍सिमीटर, इन्क्‍युबेटर, फोटोथेरपी अशा असंख्य सुविधा आणि तज्ज्ञ डॉक्‍टरांची सेवा आणि सल्ला उपलब्ध करून दिला जातो.

स्वतःच्या व्यवसायाच्या या वाटचालीत व्यस्तता असूनही सामाजिक कार्याची जाणीव त्यांनी कधी बाजूला ठेवली नाही. पुणे, नाशिक व ठाणे जिल्ह्याच्या आदिवासी भागातील डॉक्‍टरांनी एकत्र येऊन ‘ट्रायबल डॉक्‍टर फोरम’ नावाची संस्था सुरू केली आहे. डॉ. प्रमिला त्या संस्थेच्या सचिव म्हणून काम पाहतात. आदिवासी वसतिगृहातील मुलांची आरोग्य तपासणी करून मोफत औषधोपचार संस्था करते. तसेच, आदिवासी मुलांना करिअर व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करते आणि शैक्षणिक गरजांसाठी मदत करते.

मध्यंतरी पडताळणी नसताना बोगस आदिवासी दाखले घेऊन आरक्षणात घुसखोरी सुरू होती. त्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयापर्यंत खटला लढवून तो जिंकला. या खटल्यासाठी डॉक्‍टरांनी संघटनेबरोबर खूप धावपळ व पाठपुरावा केला. न्यायालयाचा हा निकाल आदिवासी बांधवांसाठी मैलाचा दगड ठरणार आहे. आदिवासी कृती समितीच्या माध्यमातून त्या करिअरविषयी मार्गदर्शनपर व्याख्याने देतात. महिलांच्या हक्कांविषयी त्यांना विशेष आस्था असून, महिला सबलीकरणावर त्या व्याख्याने देतात.

डॉक्‍टर अनेक संस्थांवर काम करतात. राजगुरुनगर डॉक्‍टर असोसिएशनच्या त्या उपाध्यक्ष आहेत. तसेच राजगुरुनगर मेडिकल प्रॅक्‍टिशनर असोसिएशनच्या सचिव म्हणून त्यांनी काम पाहिलेले आहे. येथील महाविद्यालयामध्ये त्या आरोग्याविषयी मार्गदर्शन करतात, तर विद्यालयांमध्ये एचआयव्हीबाबत किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन करतात.

रोटरी क्‍लबच्या माध्यमातून होणाऱ्या शिबिरांमध्ये महिला व मुलांची तपासणी करतात. राजगुरुनगर येथील मुंबई माता बाल संगोपन केंद्रामध्ये बालरोगतज्ज्ञ म्हणून अल्प मानधनावर काम करतात. वैद्यकीय कामाव्यतिरिक्त इतर सामाजिक कामांमध्येही त्यांचा सहभाग असतो. त्या हुतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशन संस्थेच्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभागी होतात. खेड पोलिस ठाण्याच्या महिला सुरक्षा समितीच्या त्या सदस्य आहेत.

‘आदिम यंग ग्लॅडिओटर्स’  या संस्थेच्या त्या सदस्य आहेत. या संस्थेने गेल्या डिसेंबरमध्ये पिंपळे गुरव येथे खेकडा महोत्सव आयोजित केला होता.

त्याच पद्धतीने खेड तालुक्‍यातील आदिवासी महिला बचत गटांना उत्पन्न मिळावे यासाठी त्या रानभाजी महोत्सव आणि खेकडा महोत्सवाचे आयोजन करणार आहेत. एवढे सगळे काम कमी की काय म्हणून त्यांनी आदिवासी समाजासाठी प्रेरणा वधू-वर मंडळ स्थापन केले असून, त्या उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळतात. वर्षातून दोन वधू-वर मेळावे मंडळ घेते. आदिवासी समाजात महिलांना मानाचे स्थान असून, हा समाज उच्च नीतिमूल्ये बाळगणारा समाज आहे, असे डॉ. प्रमिला बांबळे आवर्जून सांगतात.

आदिवासींमध्ये मातृसत्ताक कुटुंबपद्धती आहे. या समाजामध्ये स्त्रीभ्रूणहत्या होत नाही किंवा हुंडाबळीही होत नाही. मुलीचा जन्म झाला की आनंदोत्सव साजरा केला जातो. लग्नामध्ये वधुपित्याला वराकडच्या मंडळींनी तांदूळ किंवा रोखीच्या स्वरूपात वधूमूल्य द्यायचे असते. मुलीला वर निवडण्याचा अधिकार असतो. हा निसर्गपूजक समाज आहे. झाडांना पाणी घालून शुभकार्याची सुरवात होते. सेंद्रिय शेती केली जाते. प्रजननकाळात मासे आणि खेकडे आदिवासी पकडत नाहीत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi's Advice To Muslims: जगभरातला मुसलमान बदलतोय पण... मुस्लिम धर्मियांना पहिल्यांदाच PM मोदींनी का दिला सल्ला?

बापरे! बॉल समजून पकडला बॉम्ब ... 13 वर्षीय मुलाचा स्फोटात मृत्यू , नेमकं काय घडलं?

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : दुपारी एक वाजेपर्यंत देशात 39.92 टक्के मतदान; महाराष्ट्रात 31.55 टक्के मतदानाची नोंद

Satara Lok Sabha : उदयनराजेंनी आधी घड्याळाकडं पाहिलं अन् बरोबर 7 वाजून 7 मिनिटांनी केलं मतदान

Uber Fake Fare Scam : चालक दाखवतायत खोटं भाडं, ग्राहकांची होतेय लूट.. उबरने दिला सावधान राहण्याचा इशारा!

SCROLL FOR NEXT