पुणे

शिर्डी ः- सकाळ च्या बातमीची दखल - वेगळी बातमी

CD

----------------
सतीश वैजापूरकर
राहाता, ता.८।११।२६
----------------
SHD26B06274
शिर्डी ः संगमनेर येथील निवृत्त प्रा.सी.के.देशमुख यांचा साईसंस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सपत्नीक सत्कार केला.
-----------------
SHD26B06275
सकाळ ची बातमी
----------------------------------------------
सकाळ च्या बातमीची दखल
-----------------

सुरक्षारक्षकाचा निवृत्त प्राध्यापकाकडून सत्कार
सापडलेले दहा हजार डॉलर प्रामाणिकपणे परत
सतीश वैजापूरकर
सकाळ वृत्तसेवा
शिर्डी, ता. ९ ः सापडलेले दहा हजार डाॅलर साईभक्ताला परत करणारे साई संस्थानचे सुरक्षारक्षक कृष्णा कुलकर्णी यांच्या प्रामाणिकपणाची बातमी काही दिवसांपूर्वी ‘सकाळ’ने प्रसिद्ध केली. या बातमीची दखल घेत संगमनेर येथील निवृत्त प्राध्यापक सी. के. देशमुख यांनी दोन दिवसांपूर्वी साई संस्थानच्या कार्यालयात येऊन कुलकर्णी यांचा सत्कार केला. एवढेच नव्हे, तर त्यांना सात हजार रुपयांची बक्षिसी देखील दिली.
काही दिवसांपूर्वी कृष्णा कुलकर्णी यांना साई मंदिरात १० हजार डॉलर (सुमारे दहा लाख रुपये) असलेली बॅग सापडली होती. ती त्यांनी सुरक्षा विभागात जमा केली. सुरक्षा विभाग प्रमुख असलेले पोलिस उपनिरीक्षक रोहिदास माळी यांनी संबंधित साईभक्ताला ती बॅग परत केली. ‘सकाळ’ने त्याबाबत सविस्तर बातमी प्रसिद्ध केली. ती देशमुख यांच्या वाचनात आली. त्यांनी साई संस्थानकडे कुलकर्णी यांची चौकशी केली. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी ते सपत्नीक साई संस्थान कार्यालयात आले.
ते स्वतः संत गाडगेबाबा सेवाभावी संस्था चालवतात. त्या माध्यमातून समाजात चांगले काम करणाऱ्यांना प्रोत्साहनपर भेट देऊन त्यांचा गौरव करतात. त्यांनी याबाबत साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांना कल्पना दिली. त्यांनी कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात अनुमती दिली. यावेळी बोलताना देशमुख म्हणाले की, कुलकर्णी यांनी आपल्या कृतीतून प्रामाणिकपणाचे दर्शन घडविले. त्यांच्या या कृतीतून समाजातील इतरांना प्रेरणा मिळावी, यासाठी आज आम्ही त्यांचा सत्कार केला. त्यांना सात हजार रुपये रकमेचा धनादेश व वह्या भेट दिल्या.

कोट--------------------------------
साई संस्थानच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना साई मंदिर परिसर, प्रसादालय व धर्मशाळा परिसरात भाविकांकडून विसरलेल्या किमती वस्तू, मोबाईल व रोख रक्कम नेहमी सापडते. हे कर्मचारी प्रामाणिकपणे हा सर्व ऐवज संरक्षण विभागात जमा करतात. आम्ही ओळख पटवून भाविकांना त्या परत करतो. ‘सकाळ’ची बातमी वाचून निवृत्त प्रा. सी. के. देशमुख यांनी सुरक्षारक्षक कृष्णा कुलकर्णी यांचा सत्कार केला. त्यांना सात हजार रुपयांची बक्षिसी दिली. यामुळे इतर कर्मचा-यांना प्रेरणा मिळेल. देशमुख यांनी त्यांच्या ग्रॅच्युइटीची रक्कम बॅंकेत ठेवली. या रकमेच्या व्याजातून ते अशा भेटी देत असतात. त्यांचा उपक्रम देखील प्रेरणादायी आहे.
- रोहिदास माळी, पोलिस उपनिरीक्षक, संरक्षण विभाग प्रमुख, साईसंस्थान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Politics : "गोकुळचं दार मी उघडलं म्हणून..."; महायुतीच्या दोन बड्या मंत्र्यांवर सतेज पाटलांचा थेट प्रहार!

AI Hallucination: धक्कादायक! सरकारी आदेशातच चक्क सुप्रीम कोर्टाचे बनावट निकाल? मुंबई उच्च न्यायालयाने काय केले पाहा...

Diwali Bank Holiday: नोव्हेंबरमध्ये बँकांना सुट्ट्यांची मेजवानी! महाराष्ट्रासह 'या' ३ राज्यांत राहणार बंद; पाहा संपूर्ण वेळापत्रक

Rocket Firecrackers Ban: दिवाळीच्या उत्साहावर नियमांचं बंधन! मुंबईत रॉकेट फटाक्यांवर बंदी; महापालिकेचा मोठा निर्णय

Maharashtra Live News: "उपमुख्यमंत्रिपदासाठी सुनील तटकरेंनीच दादांचा घात केला"; रामदास कदमांच्या विधानामुळे महायुतीत खळबळ

SCROLL FOR NEXT