पुणे

शेतकऱ्यांचे वीज पंप जोड तातडीने न जोडल्यास तीव्र आंदोलन

''भाजप किसान''चा रास्ता रोकोचा इशारा

सकाळ वृत्तसेवा

इंदापूर : लोणी देवकर (ता. इंदापूर) पंचक्रोशीत महावितरणने शेतकऱ्यांचे कृषी वीजपंपांचे तोडलेले जोड तातडीने जोडावे. या मागणीसाठी माजी सहकारमंत्री, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप किसान मोर्चातर्फे आंदोलन करण्यात आले.
शेतकऱ्यांचे कृषिवीज जोड गुरुवारपर्यंत (ता. २५) न जोडल्यास शुक्रवारी (ता. २६) पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वरकुटे बुद्रुक चौकात रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा किसान मोर्चाचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख माऊली चवरे यांनी दिली. यावेळी चवरे, आकाश कांबळे व सहकाऱ्यांनी लोणी देवकर वीजवितरण कार्यालयास निवेदन दिले.

यावेळी चवरे म्हणाले, ''''महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची चालविलेली थट्टा त्वरित थांबवावी. कोरोना महामारीमधून शेतकरी कसा तरी सावरत असताना आता वीजपुरवठा खंडित केल्याने शेतकऱ्यांवर अर्थसंकट आले आहे. पशुधनास व घरी पिण्याचे पाणी आणणे देखील वीज बंद असल्याने अवघड झाले आहे. त्यामुळे सरकारला जाग आणण्यासाठी निदर्शने करण्यात आली. वीज जोड न जोडल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल.''''

भाजयुमोचे प्रदेश सचिव आकाश कांबळे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याचा प्रयत्न करत आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाची देखील शासनाने थट्टा चालवली असून, हे महाभकास आघाडीचे सरकार आहे. शेतकरी व कामगार त्यांना त्यांची जागा निश्चित दाखवून देतील.

यावेळी कर्मयोगी कारखान्याचे संचालक प्रवीण देवकर, प्रशांत गलांडे-पाटील, आबा साहेब थोरात,सागर देवकर, गणपत करे, गणेश भांडवलकर, परशुराम गुणवरे, राहुल शिंदे, मधुकर चव्हाण, ज्ञानेश्वर देवकर, लक्ष्मण चितळकर, किशोर मदने, अमोल देवकर व किसान मोर्चाचे कार्यकर्ते,शेतकरी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway News: आता तिकीट कन्फर्म होणार की नाही हे 10 तास आधीच समजणार; वेटिंग-RAC प्रवाशांना मोठा दिलासा

IPL 2026 Auction: 'खर्च कसा करणार हा...' CSK ने बोली लावलेल्या प्रशांत वीरसाठी रिंकू सिंगसह UP संघातील खेळाडूंचा बसमध्येच जल्लोष

Mumbai News: मुंबई कोस्टल रोडसाठी 9 हजार झाडे तोडणार! बीएमसीचा मोठा निर्णय; वाचा प्रकल्पाचा सविस्तर आराखडा

Expressway Toll System : आता ‘एक्स्प्रेसवे’वर टोल भरण्यासाठी गाडी थांबवून वाट पाहण्याची गरज नसणार!

Latest Marathi News Live Update :जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली

SCROLL FOR NEXT