पुणे, ता. ८ : आंतरमहाविद्यालयीन एकांकिका विश्वातील प्रतिष्ठेच्या पुरुषोत्तम करंडक स्पर्धेची नांदी १६ ऑगस्टपासून होणार आहे.
महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीसाठी शुक्रवारी (ता. ७) लॉटस् काढण्यात आले. स्पर्धेची सुरुवात ‘ट्रिनिटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च’ यांच्या ‘तुती’ या एकांकिकेने होणार आहे; तर समारोप आय. एल. एस. विधी महाविद्यालयाच्या ‘हाईड अँड सीक’ या एकांकिकेने होणार आहे.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात दिग्दर्शक आणि विद्यार्थी प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत लॉट्स काढण्यात आले. सुरुवातीस महाराष्ट्रीय कलोपासकचे चिटणीस ॲड. राजेंद्र ठाकूरदेसाई यांनी स्पर्धेचे नियम, संहितांचे परिनिरीक्षण तसेच तांत्रिक मुद्द्यांबाबत माहिती दिली. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष अनंत निघोजकर, सुहास नांगरे, मंगेश शिंदे उपस्थित होते. स्पर्धेचे यंदा ६१ वे वर्ष असून स्पर्धेत ५१ महाविद्यालयांचा सहभाग आहे. ही प्राथमिक फेरी ३० ऑगस्टपर्यंत सदाशिव पेठेतील भरत नाट्य मंदिरात होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.