पुणे

फुटबॉल

CD

PNE26W40675, PNE26W40674
अहिल्यानगर ः आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत रंगलेला सामना.


लोगो ः फिरोदिया शिवाजीयन्स फुटबॉल स्पर्धा

सेक्रेड हार्ट, आर्मी स्कूलची बाजी
गटांत एकतर्फी विजय; आराध्य, अंशुमन, माहीर, सिद्धी, प्रांजलचे गोल

अहिल्यानगर, ता. ७ ः फिरोदिया शिवाजीयन्स अकॅडमी आयोजित आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत खेळाडूंनी उत्कृष्ट सांघिक समन्वय, आक्रमक खेळ आणि भक्कम बचावाचे दर्शन घडवत प्रेक्षकांची वाहवा मिळवली. सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट स्कूल आणि आर्मी पब्लिक स्कूलच्या संघांनी दमदार कामगिरी करत प्रतिस्पर्धी संघांवर एकहाती वर्चस्व गाजवले.

सकाळच्या सत्रात १४ वर्षांखालील मुलांच्या गटात पोदार स्कूल आणि सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट स्कूल यांच्यातील सामन्यात सेक्रेड हार्ट स्कूलने १-० गोलने विजय मिळवला. पाचव्या मिनिटाला आराध्य ॲथनीने संघाचे खाते उघडले. त्यानंतर सेक्रेड हार्टच्या बचावफळीने भक्कम कामगिरी करत पोदार स्कूलला शेवटपर्यंत एकही गोल करू दिला नाही.
१६ वर्षांखालील गटात पोदार स्कूलविरुद्ध सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट स्कूलने ५-० अशा दणदणीत फरकाने विजय मिळवला. अंशुमन विधातेने चौथ्या मिनिटाला गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. त्याने २२ व्या मिनिटाला दुसरा गोल केला. माहीर गुंदेचाने २७ व ३७ व्या मिनिटाला दोन गोल केले. जोएल साठेने ३९ व्या मिनिटाला गोल करत विजयावर शिक्कामोर्तब केले.
१२ वर्षांखालील मुलांच्या गटात आर्मी पब्लिक स्कूलने श्री साई इंग्लिश मीडियम स्कूलवर २-० असा विजय मिळवला. मोहितने प्रारंभीच गोल करत संघाचे खाते उघडले, तर समीरने ८ व्या मिनिटाला दुसरा गोल केला. यात आर्मी स्कूलच्या बचावफळीने प्रतिस्पर्ध्यांना गोल करण्याची एकही संधी दिली नाही.

दुपारचे सत्र
१४ वर्षांखालील मुलांच्या गटात आर्मी पब्लिक स्कूल आणि श्री साई इंग्लिश मीडियम स्कूल यांच्यातील सामना रंगला. आर्मी स्कूलने ३-० गोलने विजय मिळविला. अजय सांगळेने ११, ४० व ४६ व्या मिनिटाला लांची हॅट्‌ट्रिक नोंदवली.
१६ वर्षांखालील मुलांच्या गटात आर्मी पब्लिक स्कूलने श्री साई इंग्लिश मीडियम स्कूलवर ३-० असा विजय मिळवला. वेदांत गवळीने १६ व १९ व्या मिनिटाला सलग दोन गोल करून संघाला मजबूत आघाडी मिळवून दिली. आदेश साबळेने ३६ व्या मिनिटाला गोल करत विजयावर शिक्कामोर्तब केले. श्री साई इंग्लिश स्कूलला एकही गोल करता आला नाही.
----------
आर्मी स्कूल विजयी
१६ वर्षांखालील मुलींच्या गटात आर्मी पब्लिक स्कूल आणि श्री साई इंग्लिश मीडियम स्कूल यांच्यातील सामन्यात आर्मी स्कूलने ४-० असा विजय मिळवला. सिद्धी पोटेने १५ व्या मिनिटाला पहिला गोल केला. प्रांजल हिने २० व ४८ व्या मिनिटाला दोन गोल केले. शर्वरीने २४ व्या मिनिटाला गोल केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra MLC Election 2026 : पदवीधर-शिक्षक मतदारसंघासाठी मतदानाची तारीख ठरली; आजपासून आचारसंहिता लागू

Meesho Share Price: दसरा-दिवाळीआधी Meesho चा शेअर सुसाट! 110% रिटर्न; बिझनेस मॉडेलची जोरदार चर्चा

'तोंड पुसायला बायकोची ओढणी नाही का?’ गौरी खानची सोडून शाहरुखने मॅनेजरच्या ओढणीने पुसला चेहरा, Viral Video पाहून नेटकरी म्हणाले...

विसर्जनाला 'अशा' हटके पद्धतीने बनवा उकडीचे मोदक! काय आहे काकूंच्या मोदकांची खासियत? Ukadiche Modak Recipe

Marathi News Live Updates : ध्वनी प्रदुषणाच्या मुद्द्यावरुन हायकोर्टाने सरकारला सुनावलं!

SCROLL FOR NEXT