Interim results of fifth and eighth scholarship examinations announced 
पुणे

पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल जाहीर

मिनाक्षी गुरव

पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत फेब्रुवारीमध्ये घेतलेल्या पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल घोषित करण्यात आला आहे. हा निकाल परिषदेच्या "www.mscepune.in" किंवा "https://puppss.mscescholarshipexam.in" या संकेतस्थळावर पाहता येणार आहे.

राज्य परिषदेने पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी), शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता आठवी) यांचा अंतरिम (तात्पुरता) निकाल जाहीर करण्यात आला आहे. शाळांना आपल्या विद्यार्थ्यांचा निकाल  त्यांच्या लॉगिनमधून तसेच पालकांना आपल्या पाल्याचा निकाल संकेतस्थळावर पाहता येणार आहे.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 
 

विद्यार्थ्यांना गुणपडताळणीसाठी संबंधित शाळांच्या लॉगिनमध्ये येत्या २० ऑक्टोबरपर्यंत  ऑनलाइन अर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे. गुणांच्या गुणपडताळणीसाठी प्रत्येक पेपरसाठी ५० रुपये याप्रमाणे शुल्काची रक्कम  ऑनलाइन पेमेंटद्वारे भरायची आहे. त्याशिवाय विद्यार्थ्यांचे नाव, आडनाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, शहर/ग्रामीण, अभ्यासक्रम यातील दुरुस्तीसाठी २० ऑक्टोबरपर्यंत संबंधित शाळेच्या लॉगिनमध्ये ऑनलाइन अर्ज उपलब्ध करून देण्यात आला आहे. हे अर्ज ऑनलाइन व्यतिरिक्त अन्य कोणत्याही पद्धतीने पाठविल्यास स्वीकारले जाणार नाहीत.

ऑनलाइनद्वारे आलेल्या अर्जानुसार गुणपडताळणीचा निर्णय संबंधित शाळेच्या लॉगिनमध्ये अर्ज प्राप्त झाल्यानंतर ३० दिवसांत कळविण्यात येईल. गुणपडताळणी अर्ज निकाली काढल्यानंतर अंतिम निकाल व गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येईल, अशी माहिती राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी दिली आहे.

पुणे- मुंबई 'एक्सप्रेस वे'वर दोन अपघात; दोघांचा मृत्यू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT