pune ring road sakal
पुणे

इंटरमिडिएट रिंगरोडमुळे रस्ते जोडणार, कोंडी फोडणार!

वर्तुळाकृती उच्च द्रुतगती उन्नत महामार्ग (एचसीएमटीआर) अद्याप कागदावर असताना आता महापालिकेने इंटरमिडिएट रिंगरोडची आखणी केली आहे.

ब्रिजमोहन पाटील

वर्तुळाकृती उच्च द्रुतगती उन्नत महामार्ग (एचसीएमटीआर) अद्याप कागदावर असताना आता महापालिकेने इंटरमिडिएट रिंगरोडची आखणी केली आहे.

पुणे - वर्तुळाकृती उच्च द्रुतगती उन्नत महामार्ग (एचसीएमटीआर) अद्याप कागदावर असताना आता महापालिकेने इंटरमिडिएट रिंगरोडची आखणी केली आहे. ७० किलोमीटरच्या या रिंगरोडमुळे पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात वाहतूक न जाता शहराच्या बाहेरच्या बाहेरच वाहतूक वळविण्याचे नियोजन महापालिकेकडून सुरू आहे.

यापैकी सध्या ४७ किलोमीटरचा रस्ता शहराच्या चारही बाजूला अस्तित्वात आहे. हे रस्ते एकमेकांना जोडून हा रिंगरोड केला जाणार आहे, त्यासाठी २३ किलोमीटरचा रस्ता केला जाईल. यात बोगदे, नदीवरील पूल, रेल्वेवरील पूल प्रस्तावित आहेत. या प्रकल्पासाठी सल्लागार नियुक्त करण्याची महापालिकेने प्रक्रिया सुरू केली असून, सुमारे २,२०० कोटींचा हा प्रकल्प असणार आहे.

शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मेट्रो, उड्डाणपूल असे प्रकल्प केले जात असले तरी सर्व प्रकारची वाहतूक शहराच्या मध्यवर्ती भागात येत आहे. त्यामुळे स्वारगेट, शिवाजीनगर, हडपसर गाडीतळ, खराडी, येरवडा, पुणे विद्यापीठ, नवले पूल, नळ स्टॉप, कात्रज चौक, पुणे विद्यापीठ चौक, चांदणी चौक या भागात येत असल्याने तेथे वाहतूक कोंडी होत आहे. ही कोंडी टाळण्यासाठी नगर रस्ता सोलापूर रस्त्याला, सोलापूर रस्ता सातारा रस्त्याला तसेच सातारा रस्ता सिंहगड रस्त्याला जोडला जाणार आहे. सिंहगड रस्ता कर्वे रस्त्याला तर कर्वे रस्ता हा बाणेर, पाषाण रस्‍त्याला जोडला जाईल. यासाठी या रस्त्यांना जोडणारे इतर रस्ते तातडीने पूर्ण केल्यास शहरात आपोआप रिंगरोड तयार होतो. २०१७ च्या विकास आराखड्यात हे रस्ते दाखविले आहेत. १९८७ पासून डीपीत दर्शविलेला ‘एचसीएमटीआर’ हा रस्ता केवळ सार्वजनिक वाहतुकीसाठी वापरला जाणार आहे. त्यावर निओ मेट्रो करण्यासाठी डीपीआर तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे हा इंटरमिडिएट रिंगरोड खासगी वाहनांसाठी उपयुक्त ठरेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

इंटरमिडिएट रिंगरोडची पाच भागांत विभागणी

  • कोथरूड, पाषाण, बाणेर रस्ता त्यात दोन बोगदे प्रस्तावित

  • पौड, कर्वे, सिंहगड आणि सातारा रस्त्याचा भाग दोन मध्ये समावेश, यात तळजाई बोगदा

  • सातारा, सोलापूर रस्त्यांना जोडणाऱ्या अपूर्ण रस्त्यांचे काम तिसऱ्या भागात

  • चौथ्या भागात सोलापूर व नगर रस्त्याचा परिसर आहे. त्यामध्ये केशवनगर खराडीला जोडणारा नदीवरील पूल, रेल्वे पूल, फुरसुंगी-मांजरी-खराडी रस्त्याचा समावेश

  • नगर रस्त्याला जुना मुंबई पुणे महामार्ग जोडणे, विश्रांतवाडी ते होळकर पूल, संगमवाडी पूल, खडकी येथे जोडणे, खराडी, वाघोली परिसराचा पाचव्या भागात समावेश

शहरातील प्रमुख रस्त्यांवरील, चौकांमधील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून देणे आवश्‍यक आहे, त्यासाठी इंटरमिडिएट रिंगरोड तयार केला जाणार आहे. सध्याचा रस्ता, भूसंपादन यासाठी नुकतीच एक बैठक झाली. या प्रकल्पासाठी सल्लागार नियुक्त करून, पुढील दोन ते तीन वर्षांत हा प्रकल्प पूर्ण केला जाणार आहे, त्यामुळे पुणेकरांना दिलासा मिळेल.

- व्ही. जी. कुलकर्णी, प्रमुख, पथ विभाग

प्रगतीचे मार्ग प्रशस्त करू...

पृथ्वीवर जन्म घेतल्यानंतर मनुष्य कोणते ना कोणते कार्य करण्यासाठी बांधील आहे. आपल्यातील प्रतिभा ओळखून कार्य करत राहणे उपयुक्त ठरते. आवडीच्या कामाचा आनंद मिळतो आणि यश व प्रगतीचे मार्ग प्रशस्तही होऊ शकतात, असे गीतेत म्हटले आहे. महापालिकेतील अधिकाऱ्यांनी गीतेतील हा उपदेश लक्षात ठेवावा. कारण वर्तुळाकृती उच्च द्रुतगती उन्नत महामार्ग अद्याप कागदावर असताना आता महापालिकेने इंटरमिडिएट रिंगरोडची आखणी केली आहे. पर्यायी मार्गामुळे पुणेकरांना दिलासा मिळेल असा दावा केला आहे. याबाबत आपल्या प्रतिक्रिया नावासह editor.pune@esakal.com या मेलवर किंवा ८४८४९७३६०२ या व्हॉट्सॲप क्रमांकावर कळवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin eKYC: लाडक्या बहिणींना दिलासा की तांत्रिक गोंधळ? लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी सुविधा सुरूच, पण अंतिम तारीख काय?

India Cricket Matches in 2026: टी२० वर्ल्ड कप ते इंग्लंड, न्यूझीलंडचे दौरे... भारतीय संघाचे २०२६ वर्षात कसे आहे संपूर्ण वेळापत्रक?

Khandala Accident : खंडाळा घाटात भीषण अपघात; भरधाव टेम्पोचे नियंत्रण सुटले; ५ वाहनांना धडक; ट्रॅफिक अर्धा तास ठप्प!

Bharat Taxi Cab Service : ‘ओला-उबर’ला मिळणार जबरदस्त टक्कर!, देशभरात आजपासून ‘भारत टॅक्सी’ कॅब सेवा सुरू

New York: न्यूयॉर्क शहराला मिळाला पहिला मुस्लिम महापौर; कुराण हातात घेऊन घेतली शपथ

SCROLL FOR NEXT