मोशी - येथील पुणे आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन केंद्राच्या जागेत साकारणाऱ्या खुल्या प्रदर्शन केंद्राचे संकल्पचित्र. 
पुणे

खुल्या प्रदर्शन केंद्राचे काम लवकरच

सकाळवृत्तसेवा

मोशीत वीस हेक्‍टर जागेत साकारणार प्रकल्प; ४४ कोटी खर्च
पिंपरी - मोशी येथील २४० एकर जागेत प्रस्तावित असलेल्या पुणे आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन केंद्रात पहिल्या टप्प्यात २०.११ हेक्‍टर जागेमध्ये खुले प्रदर्शन केंद्र साकारणार आहे. या कामासाठी ४४ कोटी २२ लाख खर्च अपेक्षित आहे. कार्यादेश देऊन महिनाअखेर हे काम सुरू करण्याचे नियोजन आहे. 

मोशी हा भाग झपाट्याने विकसित झाला असून जवळच भोसरी, चाकण आणि तळवडे औद्योगिक वसाहत आहे. त्यामुळे या परिसरातील उद्योगांना बाजारपेठ मिळावी, उत्पादित मालाला प्रकल्प सादरीकरणासाठी संधी मिळावी, या उद्देशाने औद्योगिक प्रदर्शन केंद्राचे नियोजन केले आहे. 

खुल्या प्रदर्शन केंद्राच्या कामासाठी ४९ कोटी ६४ लाख रुपयांची मूळ निविदा होती. त्याच्या तुलनेत १०.९३ टक्के कमी दराची निविदा संमत झाली. त्यानुसार आता हे काम ४४ कोटी २२ लाख रुपयांत होणार आहे. प्रदर्शन केंद्राला एकावेळी ४४ हजार नागरिक भेट देऊ शकतील, अशी व्यवस्था असणार आहे.

प्रकल्पातील प्रमुख सुविधा - प्रदर्शन केंद्राला चारी बाजूंना जोडणारे १८ व १५ मीटर रस्ते. सीमा भिंत, रिटेनिंग वॉल, आयकॉनिक प्रवेशद्वार, जागेचे सपाटीकरण. पूर्ण प्रकल्पात साडेचार हजार झाडे लावणार. अग्निशमन, विद्युत, लॅण्डस्केपिंग, महिला व पुरुष स्वच्छतागृह, वॉश बेसीन. खुले प्रदर्शन केंद्र - ९८ हजार चौरस मीटर. पार्किंग - ४३ हजार ३६० चौरस मीटर. पार्किंग व्यवस्था - १० हजार २२ कार आणि ३८ हजार दुचाकींसाठी सोय. व्हीआयपी पार्किंगची स्वतंत्र सोय. मुदत - काम सुरू झाल्यापासून १५ महिने.

हेलिपॅडही...
पुणे आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन केंद्राच्या जागेत हेलिपॅड, सौरऊर्जा प्रकल्प आणि औद्योगिक संग्रहालय असे तीन प्रकल्पही होणार आहेत. त्यासाठी प्राधिकरणाच्या अर्थसंकल्पात एकूण चार कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. 

मोशी येथील खुल्या प्रदर्शन केंद्राचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात करण्याचे नियोजन आहे. त्यानंतर या प्रकल्पाचे काम सुरू केले जाईल.
-  सदाशिव खाडे, अध्यक्ष, प्राधिकरण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'तू माझ्यासाठी सर्वात मौल्यवान...'; कतरिना कैफची पोस्ट चर्चेत, मुलगा विहानची सुद्धा दाखवली झलक

IND vs ENG: भारताला मोठा धक्का! जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे बाहेर; टॉसनंतर Playing XI जाहीर

Live Updates Marathi: एकनाथ शिंदे यांचा चंद्रभागेत नौकविहार

Maharashtrian Recipe: तिखट खायला आवडतं? घरीच बनवा झणझणीत,सुकी लाल मिरची चटणी!

FIFA World Cup 2026 Final: अर्जेंटिनाचं टेन्शन वाढवणारं वक्तव्य! फायनलआधी रॉड्रीने उघड केला स्पेनच्या विजयाचा सीक्रेट प्लॅन

SCROLL FOR NEXT