पुणे

आंतरराष्ट्रीय गणित स्पर्धेत एमएमसी इंडियाचे यश

CD

पुणे, ता. ६ : बल्गेरियातील ब्लागोएव्हग्राड येथे नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय गणित स्पर्धेत (आयएमसी) एमएमसी इंडिया संघाने उल्लेखनीय यश मिळवले. जगातील ८० विद्यापीठांच्या ४४७ पदवीपूर्व विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. भास्कराचार्य प्रतिष्ठान, पुणे आयोजित माधव गणित स्पर्धेतून निवड झालेल्या भारतीय संघातील भव्य तिवारी (आयआयटी मुंबई) यांनी ग्रँड प्रथम पारितोषिक, शौनक कार (आयएसआय कोलकाता) आणि पार्थ वर्तक (आयआयटी मुंबई) यांनी प्रथम पारितोषिक, तर निरव भट्टड (आयआयटी मुंबई) यांनी द्वितीय पारितोषिक मिळविले. संघाचे नेतृत्व डॉ. विनयकुमार आचार्य, डॉ. उदयन प्रजापती यांनी केले. देशभरातील सुमारे तीन हजार विद्यार्थ्यांमधून अंतिम संघाची निवड केली होती. राष्ट्रीय उच्च गणित मंडळ (डीएई, भारत सरकार) यांच्या आर्थिक साह्यामुळे भारतीय संघाचा सहभाग शक्य झाला. भास्कराचार्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. शशिकांत कात्रे, माधव गणित स्पर्धेचे मुख्य समन्वयक प्रा. विनायक सोलापूरकर आणि उपमुख्य समन्वयक डॉ. गीतांजली फाटक यांनी मार्गदर्शन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

England Squad vs Pakistan : पाकड्यांचा बँड वाजवण्यासाठी इंग्लंडने जाहीर केला तगडा संघ! २ वर्षानंतर एका खास ऑल राऊंडरला बोलावले... बाबरच्या संघाचे धाबे दणाणले

Abhijit Dipke: जंतरमंतर आंदोलनकर्त्यांना डावलल्याचा आरोप; मनीष ब्रह्मभट यांचा अभिजीत दीपके यांच्या घरासमोर ठिय्या

Marathi News Live Updates : पुण्यात सराईत गुन्हेगारांकडून धारदार १२ लोखंडी शस्त्रे जप्त

Nanded Guru Gobind Singh MoU: गुरु गोबिंदसिंघजींच्या विचारांच्या जागतिक प्रसारासाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा व देशभक्त विद्यापीठांचा सामंजस्य करार

Thane Crime: नामांकित बांधकाम व्यावसायिकाला यंत्रणांचा धाक दाखवून ८ कोटींची मागणी, खंडणीप्रकरणी तिघांना अटक

SCROLL FOR NEXT