International-Movie-Mahotsav
International-Movie-Mahotsav 
पुणे

देब, राव यांना ‘वसुंधरा’ पुरस्कार

सकाळ वृत्तसेवा

पुणे - किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दिला जाणारा ‘किर्लोस्कर वसुंधरा’ पुरस्कार ओडिशामध्ये भातवाणांची विविधता टिकवून ठेवण्यासाठी विशेष कार्य करणारे डॉ. देबल देब आणि पर्यावरण छायाचित्रण, लेखन करणाऱ्या आरती कुमार राव यांना जाहीर झाला आहे.

चित्रपट महोत्सवाचे आयोजन तीन ते सात जानेवारीदरम्यान बालगंधर्व आणि राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात आयोजित करण्यात आले आहे. याबद्दल माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. महोत्सवाच्या निमंत्रक गौरी किर्लोस्कर, संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम, अध्यक्ष माधव चंद्रचूड आणि संयोजक वीरेंद्र चित्राव उपस्थित होते. या महोत्सवात राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेल्या सुमारे १२५ चित्रपटांची पर्वणी रसिकांना मिळणार आहे.

महोत्सवाची सुरूवात आणि समारोप बालगंधर्व रंगमंदिर येथे होईल. ‘ग्रीन ऑस्कर’ विजेत्या ‘द पोलिसिंग लंगूर’, तर समारोप जर्मनीतील ‘द पायथॉन कोड’ या चित्रपटाने महोत्सवाचा समारोप होईल. रिट्रोस्पेक्‍टिव्ह या गटात ‘द सिक्रेट लाइफ ऑफ फ्रॉग’, ‘हॉर्न इन ट्रबल’ आणि ‘सरिस्का : रिटर्न ऑफ रोअर’ हे चित्रपट दाखविले जाणार आहेत. ‘इंटरडिपेन्डन्स’मध्ये भारतासह युरोपीय देशांमधून आलेल्या पर्यावरणावरील अकरा चित्रपट पाहण्याची संधी रसिकांना मिळणार आहे.

‘पर्यावरण बदल, वन्यजीव संरक्षण, हिमालयाच्या वेगवेगळ्या छटा दाखविणारी सेलिब्रिटिंग ऑफ हिमालया, पर्यावरण संवर्धन, जैववैविध्य संवर्धन, प्लॅस्टिक प्रदूषण यावर वैविध्यपूर्ण चित्रपट या महोत्सवात दाखविले जाणार आहेत. मिनी फिल्म फेस्टिव्हलअंतर्गत विविध महाविद्यालये महोत्सवाशी जोडली जाणार आहेत. सुमारे ४५ महाविद्यालयांमध्ये चित्रपट दाखविण्याबरोबरच, चर्चासत्रांसारखे उपक्रमही घेतले जाणार आहेत’’, असे चित्राव यांनी सांगितले.

गौरी किर्लोस्कर म्हणाल्या, ‘‘दृकश्राव्य हे सर्वांत प्रभावी माध्यम आहे. त्याद्वारे पर्यावरणासंबंधी लोकांमध्ये जागृती करण्याचा आमचा प्रयत्न आहे. ऑनलाइन नोंदणीसाठी www.kirloskarvasundharafest.in या संकेतस्थळावर संपर्क 
साधावा.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT