पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात उभारण्यात येत असलेल्या क्रीडा संकुलाचे संकल्पचित्र. 
पुणे

पुणे विद्यापीठात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडासंकुल

सकाळवृत्तसेवा

मैदानी खेळांसाठी क्रीडांगण, शूटिंग रेंज आणि धावपटूंसाठी 400 मीटर लांबीचा "ट्रॅक'
पुणे - बास्केटबॉल, व्हॉलिबॉल, टेबल टेनिस यांसारख्या खेळासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे इनडोअर स्टेडियम, मैदानी खेळांसाठी क्रीडांगण, शूटिंग रेंज आणि धावपटूंसाठी 400 मीटर लांबीचा "ट्रॅक' (धावणमार्ग) याबरोबरच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सुसज्ज असे क्रिकेटचे मैदान तयार करणार आहे.

विद्यापीठालगतच्या 27 एकरांत हे क्रीडासंकुल साकारत आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने दिलेल्या निधीमध्ये विद्यापीठाने भर घालून इनडोअर स्टेडियम, 25 मीटर शूटिंग रेंजचे काम सुरू केले आहे. तसेच, राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियानाकडून (रुसा) मिळालेल्या पाच कोटींच्या निधीतून आंतरराष्ट्रीय दर्जाचा 400 मीटरचा सिंथेटिक "ट्रॅक' तयार करण्यात येत आहे. त्याच्या आतमधील मैदानात फुटबॉलचे मैदान तयार केले जाणार आहे. फुटबॉल व्यतिरिक्त थाळीफेक, गोळाफेक, भालाफेक आदी क्रीडा प्रकार तिथे होणार आहेत.

क्रीडा संकुलात मोठा प्रकल्प हा क्रिकेटच्या मैदानाचा आहे. येत्या दोन वर्षांत तो पूर्ण करणार आहेत. एकूण 63 मीटर व्यासाचे हे मैदान असेल. दिवसा आणि रात्री सामने खेळता येतील, अशी व्यवस्था केली जाणार आहे. त्यालगत विद्यापीठाचे अतिथी निवास बांधणार आहे. एकत्रित क्रीडा संकुलासाठी पार्किंग आणि आगविरोधी यंत्रणेची स्वतंत्र व्यवस्था असेल.

याबाबत विद्यापीठाच्या स्थावर विभागाचे अभियंता आर. व्ही. पाटील म्हणाले, 'विद्यापीठात क्रिकेटचे मैदान असले, तरी प्रेक्षकांना बैठक व्यवस्था नाही. या संकुलात चांगल्या दर्जाचे क्रिकेट मैदानही असेल. विद्यापीठ आणि आंतरविद्यापीठीय स्पर्धा तिथे भरविता येतील. राष्ट्रीय स्तरावर सामन्यांसाठी जाणाऱ्या खेळांडूना सराव करण्यासाठी त्याचा उपयोग होईल. आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलांप्रमाणेच या संकुलात सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील.''

पूर्वी पारंपरिक म्हणून खेळले जाणारे क्रीडाप्रकार आता करिअर म्हणून जोपासले जाऊ लागले आहेत. त्या दृष्टीने मुलांना योग्य मार्गदर्शन आणि सरावांसाठी विद्यापीठ क्रीडा संकुल विकसित करीत आहे. विविध क्रीडा प्रकारांचे प्रशिक्षण एकाच ठिकाण करता यावे, तसेच क्रीडा क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्या होतकरू आणि गरजू मुलांना संधी मिळवून देण्यासाठी या संकुलाचा चांगला उपयोग होईल.
- डॉ. दीपक माने, क्रीडा संचालक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Metro: हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोची धावपळ; १५ जुलैपूर्वी कामे पूर्ण करण्यासाठी कसरत, अपूर्ण कामांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न?

Tilari Forest women killing Case : घटस्फोटीत महिलेसोबत संबंध, लग्नाचं अमिष दाखवून तिलारी जंगलात नेत केला खून; पितापुत्राचा रक्तरंजित थरार

Petrol-Diesel Price Today: कच्चे तेल 90 डॉलरखाली घसरले! पेट्रोल-डिझेल-CNG चे नवे दर जाहीर; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे भाव

Comedian Pranit More Show : मृतदेहाच्या खासगी अवयवावरून अश्लील विनोद; कॉमेडियन प्रणित मोरेच्या शोमधील KEM च्या विद्यार्थिनीचा व्हिडिओ पाहून युजर्स भडकले!

Indian Railways Innovation : भारताची रेल्वेमध्ये नवी क्रांती; जगात पहिल्यांदाच इलेक्ट्रीक डबल-स्टॅक कंटेनर रेल्वे धावली, अमेरिका, चीनलाही टाकलं मागे

SCROLL FOR NEXT