international women day food processor masala queen tasty food Sakal
पुणे

International Women's Day 2024 : अन्नप्रक्रिया उद्योजिका घडविणारी ‘मसाला क्वीन’

‘मसाला क्वीन’ म्हणून परिचित असलेल्या मूळच्या इचलकरंजीच्या असणाऱ्या गंधाली दिंडे यांनी अन्नप्रक्रिया क्षेत्रात अनेक उद्योजक घडवण्याचे काम केले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Pune News : ‘मसाला क्वीन’ म्हणून परिचित असलेल्या मूळच्या इचलकरंजीच्या असणाऱ्या गंधाली दिंडे यांनी अन्नप्रक्रिया क्षेत्रात अनेक उद्योजक घडवण्याचे काम केले आहे. विशेषतः महिला उद्योजक व व्यावसायिक घडविण्यावर व त्याद्वारे महिलांचे सक्षमीकरण कसे होईल, यावर त्यांचा भर आहे.

दिंडे यांनी वाणिज्य शाखेत (एम. कॉम) पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यानंतर त्यांनी हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेऊन अन्नप्रक्रियेचे कौशल्य आत्मसात केले. तसेच अन्नप्रक्रियेवर ‘सकाळ समूहा’च्या ‘एसआयएलसी’द्वारे विशेष प्रशिक्षणे देण्यास सुरुवात केली.

सुहास दिंडे यांच्याशी विवाह झाल्यांनतर त्या कोल्हापूर शहरात राहत आहेत. आपल्यातील अन्नप्रक्रियेची कौशल्ये वेगवेगळ्या संस्था, ट्रेनिंग सेंटर, महिला बचत गट, महिला मेळावे यांच्या माध्यमातून समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहचविण्याचे काम त्या करत आहेत.

विविध प्रशिक्षणे व कार्यशाळा यांच्या माध्यमातून त्या अन्नप्रक्रिया उद्योगातील व्यवसाय संधी, व्यवसाय कसा उभा करावा, शासकीय योजनांचा लाभ कसा घ्यावा, कायदेशीर प्रक्रिया, नोंदणी प्रक्रिया, अन्नसुरक्षा मानके याबाबत सविस्तर मार्गदर्शन त्या करतात. दिंडे महिलांना प्रशिक्षण देण्याचे काम निस्वार्थी भावनेने करत आहेत. याचा परिणाम असंख्य महिलांचे उद्योग त्यांनी उभे केले आहेत.

अनेक मसाला लघुउद्योजक घडवण्यामागे त्यांचा हातभार असल्याने ‘मसाला क्वीन’ अशी ओळख निर्माण झाली आहे. महिलांचा उद्योग उभा करून त्यांनी स्वयंरोजगारनिर्मितीला चालना दिली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील तेजम मसाले,

तुषार मसाले, तावडे बंधू मसाले, आरोही फूड प्रॉडक्ट, चौगुले फुड्स अँड प्रॉडक्ट असे उद्योग-व्यवसाय उभे करण्यामध्ये दिंडे यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या प्रेरणेतून अनेक महिला आज स्वतःच्या पायावर उभ्या राहत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT