पुणे

वाशिंबे येथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कुस्ती मॅटची सुविधा

CD

KTR26B09335
वाशिंबे (ता. करमाळा) : येथील अभिनव कुस्ती संकुल व विद्यालय येथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कुस्ती मॅटच्या उद्‌घाटनाप्रसंगी उपस्थित मान्यवर.
---
वाशिंबे येथे अत्याधुनिक
दोन कुस्ती मॅटची सुविधा
विद्यार्थ्यांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण
सकाळ वृत्तसेवा
केत्तूर, ता. १८ : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने अभिनव कुस्ती संकुल व विद्यालय, वाशिंबे (ता. करमाळा) येथे प्रथमच दोन आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कुस्ती मॅट उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. प्रत्येकी सुमारे साडेपाच लाख रुपये किमतीच्या या मॅटमुळे विद्यार्थ्यांना अत्याधुनिक सुविधांमध्ये प्रशिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे.
ग्रामीण भागासाठी हा उपक्रम अभिनव मानला जात असून, येथे विद्यार्थ्यांना पहिली ते बारावीपर्यंत सेमी इंग्रजी माध्यमातून शिक्षणासोबत व्यावसायिक कुस्ती प्रशिक्षण दिले जाणार आहे. बाहेरगावाहून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी निवास व सकस आहाराचीही उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे.
नव्याने उपलब्ध झालेल्या कुस्ती मॅटच्या पूजन कार्यक्रमावेळी संस्थापक आबासाहेब झोळ, प्रा. महादेव झोळ, गणेश झोळ, सतीश झोळ, शैलेश झोळ आणि पियुश डोंबाळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना खेळाच्या माध्यमातून करिअर घडवता यावे, यासाठी पूर्णवेळ कुस्ती प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले असून, भविष्यात येथे राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावरील कुस्ती स्पर्धा आयोजित करण्याचा संस्थेचा मानस असल्याचे संस्थेकडून सांगण्यात आले.
---
चाैकट
एनआयएस प्रशिक्षित प्रशिक्षकांची नियुक्ती
संस्थेच्या परिसरात १०० बाय ५० फूट आकाराचा आधुनिक आंतरराष्ट्रीय दर्जाचा इनडोर कुस्ती हॉल उभारण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्र व हरियाणातील अनुभवी आणि एनआयएस प्रशिक्षित प्रशिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात धो-धो! पुढील 48 तास अत्यंत महत्त्वाचे; पुणे-रायगडला 'रेड अलर्ट', मुंबईसह 26 जिल्ह्यांना हवामान खात्याचा मोठा इशारा

Police Transfer: पोलिसांत मोठा फेरबदल! १२५ डीएसपी अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; अनेक जिल्ह्यांना नवे अधिकारी, कुणी घेतला निर्णय?

Pune News: मोठी दुर्घटना टळली! कुसगाव खिंडीत दरड कोसळल्याने राजगड–हवेली मार्गावरील वाहतूक ठप्प; प्रशासनाने तातडीने हटवला अडथळा

Latest Marathi News Live Update : पुण्यात पावसाची संततधार; घाटमाथ्यावर पुढील तीन दिवस ‘रेड अलर्ट’

Pune Water Crisis: पुण्याची पाणीचिंता वाढली! खडकवासला धरणसाखळीतील साठा गतवर्षीपेक्षा पाचपट कमी; केवळ ७६ दिवस पुरेल इतकेच पाणी शिल्लक

SCROLL FOR NEXT