रेल्वेत चोर्या करणार्या (खाली बसलेले) टोळीचे सदस्य व दौंड पोलिसांचे पथक. Sakal
पुणे

रेल्वेत चोरी करणारी आंतरराज्य टोळी जेरबंद

दौंड पोलिसांची कामगिरी

प्रफुल्ल भंडारी

दौंड - रेल्वे प्रवाशांच्या बॅगा आणि मोबाइल संच चोरी करणार्या एका आंतरराज्य टोळीला दौंड शहरात जेरबंद करण्यात आले आहे. टोळीत हरियाणा व दिल्ली येथील एकूण सहा जणांचा समावेश आहे.

दौंड पोलिस ठाण्याचे निरीक्षक विनोद घुगे यांनी याबाबत माहिती दिली. रेल्वे गाड्यांमध्ये चोरी करणारी एक टोळी दौंड शहरात आल्याची माहिती मिळताच दौंड पोलिसांनी दौंड - सिध्दटेक रस्त्यालगत गोवा गल्ली मधील एका घरातून टोळीतील विनोद सतबीरसिंग (वय ३५), राकेश महावीर ( वय ४५ ), हंसराज दुपसिंग (वय ३३), दिपक एस. राकेश (वय २९), राजेन रोशन कुमार ( वय ३२, चौघे रा. हिसार, हरियाणा) व महिंद्र सोनु मुन्शीराम (वय ५२, रा. दिल्ली) या सहा जणांना ताब्यात घेतले.

पोलिसांनी टोळीतील सदस्यांकडून रोख २३ हजार रूपये, ०७ मोबाइल संच, ४८ नवे मोबाइल सीमकार्ड आणि बॅगा चोरण्यासाठी लागणारे उपकरणे, आदी साहित्य जप्त केले. निरीक्षक विनोद घुगे यांच्यासह फौजदार शहाजी गोसावी, हवालदार पाडुरंग थोरात, सुभाष राऊत, महेश भोसले, देसाई, पोलिस नाईक अमोल गवळी, नारायण वलेकर, कॉन्स्टेबल किशोर वाघ, अभिजीत गिरमे, निलेश वाकळे यांनी या कारवाईत भाग घेतला.

दौंड रेल्वे स्थानकावरून मांसाहारी जेवण करण्यासाठी गोवा गल्ली मध्ये ही टोळी आली होती, अशी प्राथमिक माहिती पुढे आली आहे. या टोळीविरूध्द मुंबई व परिसरातील लोहमार्ग पोलिस ठाण्यात एकूण पाच गुन्हे दाखल आहेत. दौंड पोलिसांनी या सहा संशयित आरोपींना पुढील तपास व कारवाईसाठी मुंबई लोहमार्ग पोलिस आयुक्तालयांतर्गत भाईंदर युनिटच्या अधिकार्यांच्या ताब्यात दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Live News : अवमानना याचिकेवर सुप्रीम कोर्टाची दिल्ली पोलिसांना नोटीस

RBI Special Window: रिझर्व्ह बँकेची ‘स्पेशल विंडो;तेल कंपन्यांना होणार डॉलरचा अखंडित पुरवठा

Amravati Crime: अमरावतीत आयटी इंजिनिअरने आईला संपवलं, स्वत:च पोलिसांना जाऊन सांगितलं

IND A vs AUS A: सूर्यांश शेडगेची झुंज! भारत अ संघाने ऑस्ट्रेलियासमोर ठेवलं २७६ धावांचं लक्ष्य

Jharkhand Tribal Woman : आदिवासी महिलेला पोलिस ठाण्यात उलटे टांगले अन्... पोलिसांच्या धक्कादायक कृत्याची मुख्यमंत्र्यांकडून दखल

SCROLL FOR NEXT