पुणे

इन्व्हर्टर बॅटरीच्या स्फोटात तरुण जखमी

CD

आंधळगाव, ता. २२ : घरातील इन्व्हर्टरची साफसफाई करताना बॅटरीचा अचानक स्फोट होऊन त्यातील अ‍ॅसिड चेहऱ्यावर व डोळ्यांत उडाल्याने अमोल संभाजी पवार (वय ३७) हे गंभीर जखमी झाले. बुधवारी (ता. २१) दुपारी साडेचारच्या सुमारास चिंचणी (ता. शिरूर) येथे ही घटना घडली. वेळेत उपचार मिळाल्याने त्यांच्या डाव्या डोळ्याला असलेला गंभीर धोका टळला.
अमोल पवार हे चिंचणी येथे कुटुंबासह राहतात. बुधवारी दुपारी ते घरातील इन्व्हर्टरची साफसफाई करत असताना अचानक बॅटरीचा स्फोट झाला. त्यातील अ‍ॅसिड चेहऱ्यावर आणि डोळ्यांत उडाल्याने त्यांच्या चेहऱ्याला मोठी दुखापत झाली, तर डाव्या डोळ्यालाही इजा झाली. कुटुंबीयांनी त्यांना तातडीने शिरूर येथील नेत्रतज्ज्ञ डॉ. स्वप्निल भालेकर यांच्या दवाखान्यात दाखल केले. योग्य उपचारानंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. दरम्यान, गुरुवारी (ता. २२) एक्साइड बॅटरी कंपनीचे तंत्रज्ञ अनिल देडंगे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. इन्व्हर्टर मशीनमधील तांत्रिक बिघाडाची त्यांनी तपासणी केली. या घटनेची कंपनीने सखोल चौकशी करून अमोल पवार यांना नुकसानभरपाई द्यावी, अन्यथा आम्ही कायदेशीर मार्गाने न्याय मागणार आहोत, अशी मागणी चिंचणीचे माजी उपसरपंच दादासाहेब पवार यांनी केली आहे.

बॅटरी फुटण्यामागे चार ते पाच संभाव्य कारणे असू शकतात. मात्र, स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. संबंधित बॅटरी बदलून देण्यात आली आहे. नुकसानभरपाई द्यायची की नाही, हा निर्णय कंपनीच्या अखत्यारीत आहे. तरीही संबंधितांना या प्रकरणात योग्य ते सहकार्य केले जाईल.
- किरण सातकर, सेवा अभियंता, एक्साइड बॅटरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED Raid : अवैध स्त्रीबीज खरेदी-विक्री रॅकेटप्रकरणी बारामती, ठाणे आणि नाशिकमध्ये ईडीचे छापे; २९ लाखांची रोकड जप्त

Ration Card e-KYC: रेशनकार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी! आता घरबसल्या करता येणार ई-केवायसी; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Latest Marathi News Live Update : 'हा' तर शिंदेंना गोत्यात आणण्याचा डाव; गुलाबराव पाटीलांनी केली ऑडिओ क्लिपच्या SIT चौकशीची मागणी

IND vs NZ 2nd T20: भारत न्यूझीलंडचा दुसरा टी-२० सामना कधी अन् कुठे पाहता येणार? LIVE Streaming, वेळ अन् TV चॅनेलची माहिती जाणून घ्या

Farmer Loan Waiver : कर्जमाफीची चौथी यादी जाहीर; पुण्यातील १६ हजार २४६ शेतकऱ्यांचा समावेश

SCROLL FOR NEXT