पुणे

Pune Porsche Accident : पुण्यातल्या 'ड्रंक अँड ड्राईव्ह'प्रकरणी तपास अधिकारी बदलला; 'यांच्याकडे' दिली जबाबदारी

संतोष कानडे

पुणेः १९ मे रोजी पुण्यातील कल्याणी नगर भागामध्ये झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी अल्पवयीन आरोपीला बारा तासांच्या आत जामीन मंजूर झाल्याने विविध स्तरातून संताप व्यक्त होत होता.

याच प्रकरणात काही वेळापूर्वी दोन पोलिस अधिकाऱ्यांचं निलंबन झाल्यानंतर आता तपास अधिकारी बदलण्यात आलेला आहे. पोलिस अधिकारी आरती बनसोडे यांच्याकडून तपास काढून घेऊन तो गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलेला आहे.

या प्रकरणी येरवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला होता. अपघातानंतर कार्यवाही करण्यास दिरंगाई केल्यामुळे दोन कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे. प्रकरणात अधिकारी बदलला असून गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त सुनील तांबे यांच्याकडे अपघात प्रकरणाचा तपास देण्यात आलेला आहे.

दरम्यान, निलंबित पोलिस अधिकाऱ्यांमध्ये पोलिस निरीक्षक राहुल जगदाळे आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक विश्वनाथ तोडकरी यांचा समावेश आहे. तपासात दिरंगाई केल्याचा आणि अपघाताची माहिती वेळेत वरिष्ठांना दिली नाही, असा ठपका ठेवत या दोघांचे निलंबन करण्यात आलं आहे. निलंबित करण्यात आलेले दोन्ही अधिकारी हे येरवडा पोलिस ठाण्यातील असून अपघात झाला त्या रात्री हे दोघे त्या ठिकाणी ड्युटीवर होते.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

हिट अँड रनची ही घटना 19 मे रोजी घडली होती. पुण्यातील कल्याणीनगर भागात रिअल इस्टेट डेव्हलपर विशाल अग्रवाल यांच्या 17 वर्षीय मुलाने दोन दुचाकीस्वार अभियंत्यांना त्याच्या स्पोर्ट्स कार पोर्शेने चिरडले, त्यात त्या दोघांचा मृत्यू झाला. या घटनेच्या 14 तासांनंतर अल्पवयीन आरोपीला कोर्टातून काही अटींसह जामीन मिळाला.

न्यायालयाने त्याला 15 दिवस वाहतूक पोलिसांसोबत काम करण्याचे निर्देश दिले होते आणि रस्ते अपघातांचे परिणाम आणि उपाय यावर 300 शब्दांचा निबंध लिहिण्यासाठी सांगण्यात आले होते. मात्र, आरोपी दारूच्या नशेत असून सुसाट वेगाने कार चालवत असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. सध्या अल्पवयीन सुधारगृहात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi Live Updates: बनावट नोकरीच्या जाहिरातींविषयी नागपूर मेट्रोचा इशारा

मृत डॉ. शिरीष वळसंगकरांच्या घरातील भांडण पोलिस ठाण्यात! रुग्णालयावरील घरात राहण्यावरून डॉक्टरांचे जावई अन्‌ सून डॉ. शोनाली यांच्यात वाद; सदर बझार पोलिसांत तक्रारी

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : २० जून २०२६ ते २६ जून २०२६ - मराठी राशी भविष्य

Aloo Cheese Thecha Paratha: साधा पराठा विसराल; एकदा खा हा आलू चीज ठेचा पराठा!

आजचे राशिभविष्य - 20 जून 2026

SCROLL FOR NEXT