Amitesh Kumar eSakal
पुणे

Pune Crime : बोपदेव घाट लैंगिक अत्याचार प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे; इतर दोन आरोपींचा शोध अद्याप सुरूच

बोपदेव घाटात तरुणीवर सामूहिक लैंगिक अत्याचार प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. याबाबतचा आदेश पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - बोपदेव घाटात तरुणीवर सामूहिक लैंगिक अत्याचार प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. याबाबतचा आदेश पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला. या प्रकरणात पोलिसांनी शुक्रवारी (ता. ११) एका आरोपीला अटक केली असून, अन्य दोघांचा शोध घेण्यात येत आहे.

चंद्रकुमार रवीप्रसाद कनोजिया (वय २०, रा. डिंडोरी, मध्य प्रदेश) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. आरोपी कनोजिया आणि त्याच्या इतर दोन साथीदारांविरुद्ध जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. इतर दोघा आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत. ते मध्य प्रदेशातून चोरीच्या उद्देशाने पुण्यात आले होते.

आरोपींनी गुन्हा करण्यापूर्वी बोपदेव घाटात गुरुवारी (ता. ३) रात्री दहाच्या सुमारास मद्य प्राशन केले. त्यानंतर त्यांनी घाटात बसलेल्या तरुण-तरुणीला बांबूने मारहाण केली. कोयत्याच्या धाक दाखवून तिघांनी तरुणीवर लैंगिक अत्याचार केला. तरुणीवर अत्याचार केल्यानंतर आरोपी बोपदेव घाटातून दुचाकीवरून पसार झाले.

ते सातारा रस्त्यावरील शिंदेवाडी परिसरात गेले. पोलिसांना चकवा देण्यासाठी मुख्य रस्त्याऐवजी अंतर्गत रस्त्यांचा वापर केला. सुमारे २० किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी ८० किलोमीटरचा प्रवास केला. सासवड परिसरात एका पेट्रोल पंपावरील चित्रीकरणात आरोपींचे चेहरे स्पष्ट आढळून आले होते. तसेच, एका मद्य विक्री दुकानात मद्य सेवन करीत असल्याचे दिसून आले.

आरोपींपैकी एकजण सराईत असल्याने त्याचे रेकॉर्ड तपासण्यात आले. या प्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने गुन्हे शाखेकडे तपास सोपविण्यात आला आहे. पोलिस कोठडीत असलेल्या आरोपीकडून इतर दोघा आरोपींची माहिती घेण्यात येत आहे. परंतु अद्याप काही माहिती मिळालेली नाही, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : मूक आक्रंदनाचा वारसा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 4 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : कोल्हापुरात पंचगंगेच्या पातळीत एक फुटाने वाढ, ५० बंधारे पाण्याखाली

ढिंग टांग : वाजत गाजत या...!

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

SCROLL FOR NEXT