पुणे

गुंतवणूकदारांना १५ कोटींचा गंडा

CD

पुणे, ता. ३० : गुंतवणूकदारांना जादा परताव्याचे आमिष दाखवून १४ कोटी ७१ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. ‘बोट ब्रो’ आणि ‘माइन क्रिप्टो’सह विविध बनावट कंपन्या आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून हा प्रकार सुरू होता. याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात दुबईस्थित मुख्य सूत्रधारासह २३ हून अधिक जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत प्रतीक भोसले (वय २५, रा. शेटफळ गढे, ता. इंदापूर) यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मुख्य संशयित आरोपी लवीश चौधरी ऊर्फ नवाब अली (रा. अलबरशा, दुबई, मूळ रा. मुझफ्फरनगर, उत्तर प्रदेश) याच्यासह पुणे आणि साताऱ्यातील विविध कंपन्यांच्या संचालकांचा आरोपींमध्ये समावेश आहे. हा प्रकार ११ फेब्रुवारी २०२३ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी पुणे रेल्वे स्थानकासमोरील हॉटेल आणि बाणेरमधील ऑर्किड हॉटेल परिसरात गुंतवणूकदारांच्या बैठका घेतल्या. आरोपींनी फिर्यादी प्रतीक आणि त्यांच्या आई-वडिलांना ‘बोट ब्रो’ कंपनीत गुंतवणूक केल्यास अल्पावधीत भरघोस नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांचे २२ लाख ७० हजार रुपये गुंतवून घेतले. याशिवाय, इतर २१ गुंतवणूकदारांनाही कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करण्यास भाग पाडले.

आरोपींनी ही रक्कम त्यांच्या शेल कंपन्यांच्या बँक खात्यांवर ‘आरटीजीएस’, ‘एनईएफटी’, रोख रक्कम आणि ‘यूएसडीटी’ क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून जमा करून घेतली. मात्र, मुदत संपल्यानंतरही गुंतवणूकदारांना परतावा न देता १४ कोटी ७१ लाख रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणात आणखी गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.

आर्थिक गुन्हे शाखेकडे तपास
गुन्ह्याची व्याप्ती लक्षात घेता, या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. गुंतवणूकदारांनी पोलिस आयुक्त कार्यालयातील आर्थिक गुन्हे शाखेत संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस उपायुक्त विवेक मासाळ यांनी केले आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक दिनेशकुमार पाटील करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ausa Crime : शेतातील शेडमध्ये सुरू होता बनावट दारूचा कारखाना! येल्लोरीत राज्य उत्पादन शुल्क विभागाचा छापा; ५.२३ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघे ताब्यात

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंचं मोठं पाऊल! मुदत संपलेल्या अन्नपदार्थांच्या पुनर्विक्रीबाबत नवे नियम लागू

Marathi News Live Updates : नवी मुंबई महापालिकेच्या दुर्लक्षाविरोधात ठाकरे सेना आक्रमक; तुर्भे उड्डाणपुलासाठी ठाणे-बेलापूर महामार्ग रोखला

Eye Infection Alert in Pune: डोळे येण्यापासून बचावासाठी फक्त औषधं पुरेशी नाहीत! वैयक्तिक स्वच्छतेबाबत डॉक्टरांनी दिला कानमंत्र

गुरुच्या राशीबदलाने ५ राशींना अच्छे दिन! करिअरमध्ये प्रगती, रखडलेली कामंही पूर्ण होणार

SCROLL FOR NEXT