uddhav thackeray.jpg 
पुणे

भूमिपूजनासाठी उद्धव ठाकरेंना निमंत्रण द्यायलाच हवं; राम मंदिर ट्रस्टची भूमिका

सकाळवृत्तसेवा

पुणे- अयोध्येत भव्य दिव्य असं राम मंदिर उभारलं जाणार आहे.  ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन केले जाणार आहे. या कार्यक्रमासाठी देशभरातील १५० जणांना निमंत्रण दिलं जाणार आहे. त्यासाठी कोणाला निमंत्रण द्यायचं याची यादी तयार करण्याचे काम सुरू आहे. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निमंत्रण दिले पाहिजे, अशी भूमिका राम मंदिर ट्रस्टचे विश्वस्त श्री गोविंदगिरी महाराज यांनी मांडली आहे. ते पुण्यात  बोलत होते.

इंडिगो करणार कर्मचारी कपात; तब्बल एवढ्या कर्मचाऱ्यांना 'नारळ'
शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी राम मंदिराच्या उभारणीसाठी अनेकवेळा भूमिका मांडली आहे. त्यांचे कार्य यामध्ये खूप मोठे असल्याने आणि त्यांचा वारसा पुढे घेऊन जाणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले पाहिजे. तसेच या भूमिपूजनामध्ये प्रत्येकाने घरी किंवा मंदिरात जाऊन पूजा करून सहभागी व्हावे. मात्र, सर्वांनी शारीरिक अंतराचे पालन नक्की करावे, काही दान आणि काही जमीन विकत घेउन, आठ एकरात मंदिर उभारण्यात येईल. संपूर्ण देशाचं प्रतिबिंब त्यात दिसणार आहे, असं ते म्हणाले.

कोरोनाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनाला जाणार असल्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतीच त्यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे देशपातळीवर बराच खल झाला, त्यावर अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटल्या. त्यानंतर आता राम मंदिर ट्रस्टमधील विश्वस्त असलेले आचार्य किशोरजी व्यास यांनी देखील पवार यांच्यावर टीका केली आहे. काही लोकांना मोदी आवडतच नाहीत त्यामुळं मोदीचं नाव घेताच त्यांच्या पोटात कसंतरी व्हायला लागतं, अशा शब्दांत त्यांनी टीका केली आहे.

'कोरोनाजन्य परिस्थितीत भारताची जमीन बळकावण्याचा चीनचा डाव'
दरम्यान, बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित असलेला राम मंदिर-बाबरी मशिद वाद सर्वोच्च न्यायालयाने सोडवला. न्यायलयाने विवादीत जागा हिंदू पक्षकारांना दिली आहे. तसेच मुस्लीम पक्षकारांना अयोध्या परिसरात २.७ एकर जागा देण्यास सांगितले आहे. शनिवारी झालेल्या राम मंदिर ट्र्स्टच्या बैठकीत राम मंदिराचे भूमिपूजन ५ ऑगस्ट रोजी करण्याचे ठरले आहे. शिलान्यास करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निमंत्रित करण्यात आलं आहे. मात्र, कोरोना विषाणूने देशात हाहाकार माजवला असताना, भूमिपूजनाचा कार्यक्रम होत असल्याने टीका होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी VVIP नाहीत, तातडीने सुनावणी घ्या; याचिकाकर्त्याच्या मागणीवर सुप्रीम कोर्टाने फटकारलं, म्हणाले...

Aditya Thackeray Shares Student Video : कोल्हापुरातील विद्यार्थ्याचा व्हिडिओ आदित्य ठाकरेंकडून शेअर; फडणवीसांना थेट सवाल, उद्धव ठाकरेंशीही फोनवरून चर्चा

Jalgaon News: तामिळनाडुचे मुख्यमंत्री विजय यांचं फेक अकाउंट, जळगाव कनेक्शन समोर; होमगार्डची चौकशी

Marathi News Live Updates : लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ACB ची धाड

Team India Schedule : १४ वन डे, १६ ट्वेंटी-२० अन् ७ कसोटी! IPL 2027 पर्यत टीम इंडियाचं वेळापत्रक; विराट, रोहितच्या फॅनसाठी मेजवानी

SCROLL FOR NEXT