नवी दिल्ली, ता.१८ (वृत्तसंस्था) ः ‘ॲपल’चे बहुचर्चित ‘आयफोन-१८ प्रो’ आणि ‘आयफोन-१८ प्रो मॅक्स’ यांची आजपासून देशभर विक्री सुरू झाल्यानंतर ग्राहकांच्या त्याच्यावर अक्षरशः उड्या पडल्या. मुंबई, दिल्ली, कोलकता आणि बंगळूरमधील स्टोअरबाहेर लोकांनी मध्यरात्रीपासूनच खरेदीसाठी गर्दी केली होती. मुंबईतील ‘जिओ वर्ल्ड ड्राइव्ह’ येथील स्टोअरबाहेर तरुणाईच्या रांगा लागल्या होत्या. बंगळूरमध्येही काहीसे असेच चित्र पाहायला मिळाले. बंगळूरमधील राहुल माध्यमांशी बोलताना म्हणाला, की आपण पहाटे पाचच्या सुमारासच खरेदीसाठी येथे आलो होतो पण हरियाना, दिल्ली आणि मुंबईमधून देखील लोक येथे आधीपासूनच आल्याचे मला दिसले. भारतामध्ये ‘आयफोन-१८ प्रो’ हा १ लाख ६४ हजार ९०० रुपयांना उपलब्ध असून ‘आयफोन ड्युओ’ची किंमत ही २ लाख ९९ हजार ९०० रुपये एवढी आहे.
प्रतिक्रिया
‘आयफोन-७’ ची खरेदी मला आजही आठवते, बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी आलेला प्रत्येक आयफोन मी खरेदी केला आहे. फोन खरेदी करणे हे माझ्यासाठी एका उत्सवासारखे असते. दरवर्षी वेगळा आयफोन खरेदी करण्याचा माझा प्रयत्न असतो.
- राहुल, बंगळूर
खरेदीसाठी मुंबईत दाखल
- आदल्या रात्रीच नाशिकमधून खरेदीसाठी मुंबईमध्ये दाखल झालेल्या हितेश पटेल यांनी गुरुवारी रात्री दहापासून येथील स्टोअरबाहेर रांगा लागल्याचे आपण पाहिल्याचे माध्यमांशी बोलताना सांगितले. याआधी मी ‘आयफोन १७ - प्रो मॅक्स’ वापरत होतो. आता ‘१८- प्रो मॅक्स’ खरेदी करत आहे, असे ते म्हणाले.
दिल्लीच्या दिशेने धाव
- दिल्ली आणि नोएडा परिसरातील स्टोअरबाहेर आयफोन खरेदीसाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. अनेक लोक हे पंजाब, हरियाना या शेजारी राज्यांतून येथे आले होते. काहींनी आपण आतापर्यंत साठविलेले सोने विकून हा आयफोन खरेदी करत आहोत, असे सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.