पुणे

होर्मुझसाठी इराणची नवी यंत्रणा

CD

हेड
होर्मुझसाठी इराणची यंत्रणा

सबहेड
पर्शियन प्राधिकरणाची माहिती
रिअल टाइम अपडेट कळणार


तेहरान, ता.१८ (वृत्तसंस्था) ः होर्मुझच्या सामुद्रधुनीची नाकेबंदी करणाऱ्या इराणने आता तिच्यावर देखरेख ठेवण्यासाठी एक उच्चस्तरीय सुरक्षा समिती स्थापन करण्याची घोषणा आज केली. पर्शियन आखात सामुद्रधुनी प्राधिकरणाने (पीजीएसए) समाजमाध्यमांवरून याबाबतची माहिती दिली. होर्मुझमधील कारवाईविषयी ‘रिअल टाइम अपडेट’ आणि ताज्या घडामोडी यावरून कळू शकतील, असे या पोस्टमध्ये म्हटले आहे. या संघर्षाच्या ज्वाळा निवळाव्यात म्हणून अमेरिका आणि इराण यांच्यात अप्रत्यक्ष बोलणी सुरू असून त्यात पाकिस्तानने मध्यस्थी केली आहे.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बाघेई यांनी ही माहिती दिली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील आज माध्यमांशी संवाद साधताना होर्मुझ खुली करण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. चीन दौऱ्याबाबतही त्यांनी माहिती दिली. इराणला कोणत्याही परिस्थितीमध्ये अण्वस्त्र मिळता कामा नये, अशीच जिनपिंग यांची देखील भूमिका असल्याचे ते म्हणाले. होर्मुझची सामुद्रधुनी खुली व्हावी म्हणून तुम्ही दबाव आणा, अशा प्रकारचा आग्रह आपण त्यांच्याकडे धरला नव्हता पण आम्ही जी भूमिका घेतली त्याला चीन स्वतंत्रपणे पाठिंबा देऊ शकतो, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे.

इराणचा चौदा कलमी प्रस्ताव
इराणने युद्ध थांबविण्यासाठी आणि परस्पर विश्वास प्रस्थापित करण्यासाठी पाकिस्तानच्या माध्यमातून चौदा कलमी नवा प्रस्ताव सादर केला आहे.
युद्धाबाबत वाटाघाटी करणाऱ्या पथकातील सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, इराणचा हा नवा प्रस्ताव पाकिस्तानमार्फत पाठविण्यात आला आहे. युद्ध थांबविणे आणि इराण-अमेरिकेतील विश्वास पुन्हा निर्माण करण्यावर या प्रस्तावात भर देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Live News : सरकारने लोकांची गैरसोय करुन आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न केला- आशुतोष रांका

RBI Special Window: रिझर्व्ह बँकेची ‘स्पेशल विंडो;तेल कंपन्यांना होणार डॉलरचा अखंडित पुरवठा

Amravati Crime: अमरावतीत आयटी इंजिनिअरने आईला संपवलं, स्वत:च पोलिसांना जाऊन सांगितलं

IND A vs AUS A: सूर्यांश शेडगेची झुंज! भारत अ संघाने ऑस्ट्रेलियासमोर ठेवलं २७६ धावांचं लक्ष्य

Jharkhand Tribal Woman : आदिवासी महिलेला पोलिस ठाण्यात उलटे टांगले अन्... पोलिसांच्या धक्कादायक कृत्याची मुख्यमंत्र्यांकडून दखल

SCROLL FOR NEXT