कच्च्या तेलाची बिकट वाट
इराणच्या युद्धाला तोंड फुटल्यानंतर कच्च्या तेलाच्या दरामध्ये वेगाने वाढ झाली आहे. युद्धातील घडामोडी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वेळोवेळी केलेल्या विधानांचा तत्काळ परिणाम तेलाच्या दरांवर दिसून आला.
दिवस दर (डॉलर प्रतिबॅरेल)
१७ फेब्रुवारी ६६.८७
१९ फेब्रुवारी ७१.२७
२६ फेब्रुवारी ७०.८४
२७ फेब्रुवारी ७२.८७
२८ फेब्रुवारी ७२.८७
२ मार्च ७७.७४
४ मार्च ८१.४
५ मार्च ८५.४१
६ मार्च ९२.६९
९ मार्च ९८.९६
१० मार्च ८७.८
१२ मार्च १००.४६
१६ मार्च ९६.०४
१७ मार्च ९९.३९
२० मार्च १०६.४१
२३ मार्च ९५.९२
२४ मार्च १००.२३
२५ मार्च ९७.२६
२७ मार्च १०५.३२
३० मार्च १०७.३९
१ एप्रिल १०१.१६
३ एप्रिल १०९.०३
६ एप्रिल १०९.७७
८ एप्रिल ९४.७५
१३ एप्रिल ९९.३६
१४ एप्रिल ९४.९३
१६ एप्रिल ९९.३९
१७ एप्रिल ९०.३८
२२ एप्रिल १०१.९१
२४ एप्रिल ९९.१३
३० एप्रिल ११०.४
१ मे १०८.१७
४ मे ११४.४४
६ मे १०१.२७
९ मे १०१.२९
११ मे १०३.७९
....
१७ फेब्रुवारी : अमेरिका-इराण तणावामुळे कच्च्या तेलाचे दराचा सहा महिन्यांतील उच्चांक
१९ फेब्रुवारी ते २६ फेब्रुवारी : अमेरिका-इराणमध्ये चर्चा, मात्र तोडगा नाही. त्यामुळे तेलाच्या दरात मोठा बदल नाही
२८ फेब्रुवारी : अमेरिका-इस्राईलच्या हल्ल्यानंतर युद्धाला सुरुवात. जागतिक शांततेसमोरील अनिश्चितता गडद.
२ मार्च : युद्धाची तीव्रता वाढल्याने कच्च्या तेलाचे दर वेगाने वाढण्यास सुरुवात
४ मार्च-११ मार्च : इराणने बिनशर्त शरणागती पत्करावी : ट्रम्प; कच्च्या तेलाच्या दरात आठवडाभरात ३५ टक्क्यांनी वाढ
१२ मार्च : होर्मुझमधील वाहतूक ठप्प झाल्याने चार वर्षांमध्ये पहिल्यांदा कच्च्या तेलाचे दर १०० डॉलरच्या पुढे. याआधी २०२२मध्ये युक्रेन युद्धामुळे तेलाचे दर १०० डॉलरपर्यंत पोहोचले होते.
२० मार्च : होर्मुझ सामुद्रधुनी बंदच राहिल्यामुळे कच्च्या तेलाचे दर पुन्हा १०६ डॉलरपर्यंत.
२३ मार्च : युद्ध संपविण्यासाठी अमेरिका-इराण चर्चा सुरू आहे : ट्रम्प
२८ मार्च : हौथी दहशतवाद्यांचा इस्राईलवर क्षेपणास्त्र हल्ला
१ एप्रिल : युद्ध लवकर संपेल : ट्रम्प
७ एप्रिल : इराणवरील नियोजित हल्ले दोन आठवड्यांसाठी थांबविणार : ट्रम्प
१३ एप्रिल : पाकिस्तानमधील चर्चा फिसकटल्यानंतर, अमेरिकी नौदलाकडून इराणची नाकेबंदी
१७ एप्रिल : व्यावसायिक वाहतुकीसाठी होर्मुझ पूर्ण खुली : अब्बास अराघची
२० एप्रिल : अमेरिकेकडून इराणच्या मालवाहू जहाजांवर गोळीबार
२३ एप्रिल : होर्मुझची कोंडी कायम; इराणमधील संवादकाचा राजीनामा
३० एप्रिल : करार होईपर्यंत होर्मुझची नाकेबंदी सुरूच राहणार : ट्रम्प
४ मे : वाढत्या हल्ल्यांमुळे शस्त्रसंधीवर प्रश्नचिन्ह
६ मे : अमेरिका-इराण करारापर्यंत पोहोचल्याची चर्चा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.