IRCTC does not cancels their trip even there is corona  
पुणे

कोरोनाच्या उद्रेकातही सहलीचा "आयआरसीटीसी'चा हेका कायम!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शहरात कोरोना व्हायरसचा उद्रेक झालेला असताना उत्तर भारत दर्शनाची सहल रद्द करावी, अशी मागणी बहुसंख्य प्रवासी करीत असले तरी, सहल काढण्यावर आयआरसीटीसी ठाम आहे. त्यामुळे पुण्यातील किमान 500 ते 600 प्रवाशांचे पैसे पाण्यात जाण्याची वेळ आली आहे. रेल्वेचे स्थानिक अधिकारी दिल्लीकडे बोट दाखवित आहेत तर, जिल्हा प्रशासन ढिम्म आहे. त्यामुळे आगीतून फुफाट्यात पडण्याची वेळ या प्रवाशांवर आली आहे.

रेल्वेच्या "आयआरसीटीसी' कंपनीने उत्तर भारत दर्शनाची सहल आयोजित केली आहे. दहा दिवसांच्या या सहलीसाठी प्रत्येकी 9 हजार 400 रुपये आकारण्यात आले आहेत. 14 मार्च रोजी पहाटे तीन वाजता ही सहल निघणार आहे. मात्र, गेल्या पाच दिवसांपासून शहरात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. घराबाहेर पडू नका, असा सल्ला जिल्हा प्रशासन देत आहे. त्यामुळे ही सहल रद्द करावी, अशी मागणी प्रवासी करीत आहेत. हडपसरजवळील उंड्रीगावातील 14 प्रवाशांचा एक ग्रूप त्यासाठी गेल्या पाच दिवसांपासून विनवण्या करीत आहेत. परंतु, रेल्वे अधिकारी नियमांकडे बोट दाखवित आहेत.

या गाडीतून सुमारे 740 प्रवासी प्रवास करणार आहेत. हे सर्व प्रवासी पुणे आणि परिसरातील आहेत. त्यात सुमारे 70 टक्के ज्येष्ठ नागरिक आहेत. कोरोनाचा धोका ज्येष्ठ नागरिकांना जास्त आहे, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे सहल रद्द करावी किंवा पुढे ढकलावी, अशी या प्रवाशांची मागणी आहे. अन्य प्रवासी गटांनीही सहल रद्द करण्याचा आग्रह रेल्वेच्या स्थानिक अधिकाऱ्यांकडे धरला आहे. परंतु, "आयरसीटीसी'चे दिल्लीतील अधिकारी या बाबत ठाम आहेत. नियोजीत तारखेपूर्वी चार दिवस अगोदर प्रवाशांनी सहल रद्द केल्यास त्यांना एक रुपयाही परत मिळत नाही, असा नियम आहे. परंतु, तत्पूर्वी अर्ज केलेला असला तरी, त्यांना पैसे परत देण्याबाबतही "आयआरसीटीसी' उदासीनता दाखवत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hijab Controversy Update : हिजाब विवादात नवीन अपडेट!, नुसरत परवीन नोकरी करणार, कुटुंबही नाराज नाही

1xBet Case: युवराज सिंग, उर्वशी रौतेला, सोनू सूदसह अनेक सेलिब्रिटींची कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त; ईडीची मोठी कारवाई, कारण काय?

नागपूरमध्ये डॉक्टरला हनीट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न, दोन कोटींची मागितली खंडणी, सात जणांना अटक; गुन्हे शाखेने कसा रचना सापळा?

Ladki Bahin Yojana : आज पैसे येतील का?’—लाडकी बहीण योजनेतील विलंबामुळे महिलांमध्ये अस्वस्थता; डोळे ‘मोबाईल मेसेज’ कडे!

Latest Marathi News Live Update : मुंबईत अनेक ठिकाणी एनएसजी कमांडो आणि पोलिसांनी केले मॉक ड्रिल

SCROLL FOR NEXT