पुणे

लोखंडी पत्रे चोरणारा जेरबंद

CD

लोखंडी पत्रे चोरणारा जेरबंद
पावणे चार लाखांचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर, ता. १८ ः शेड बांधकामासाठी आणून ठेवलेले लोखंडी पत्रे चोरी करणाऱ्या आरोपीला कोतवाली पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने शिताफीने अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीस गेलेले लोखंडी पत्रे तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेले वाहन असा एकूण तीन लाख ७६ हजार ६०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कोतवाली पोलिस ठाण्यात १२ मे रोजी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस निरीक्षक गायकवाड संभाजी यांना माहिती मिळाली की, सदर गुन्ह्यातील संशयित आरोपी हा केडगाव वेशीजवळ येणार आहे. या माहितीच्या आधारे गुन्हे शोध पथकाने तत्काळ सापळा रचून संशयितास ताब्यात घेतले. चौकशीत संशयिताने आपले नाव संभाजी जॉन कांबळे (वय ३९, रा. दुधसागर सोसायटी, केडगाव) असे सांगितले. त्याला विश्वासात घेऊन चौकशी केली असता, त्याने चोरीची कबुली दिली. त्याने २६ हजार ६०० रूपये किमतीचे १४ लोखंडी पत्रे चोरी केल्याचे मान्य केले. चोरीसाठी स्वतः मालकीचा टेम्पो वापरल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून टेम्पो व लोखंडी पत्रे असा मुद्देमाल जप्त केला आहे. उपनिरीक्षक प्रवीण पाटील यांच्यासह पोलिस अंमलदार बाळकृष्ण दौंड, विनोद बोरगे, राहुल शिंदे, साबीर शेख, विशाल दळवी, विजय ठोंबरे, शरद वाघ आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ATM Cash Shortage: एटीएममध्ये पैसे का नाहीत? अनेक शहरांमध्ये 'कॅश'चा तुटवडा; आरबीआयचं मोठं पाऊल

Pune Mumbai Railway Route Close : मोठी बातमी! पुणे-मुंबई रेल्वे मार्ग बुधवारी देखील राहणार बंद; दिवसभरात १४ गाड्या रद्द

Raigad Flood Exploitation: रायगडमध्ये पूरग्रस्तांची अमानवी लूट; टपरीवाल्यांकडून अन्न-पाण्याचे दुप्पट-तिप्पट दर, कडक कारवाईची मागणी

Pune Milk Union : पुणे दूध संघातील गैरव्यवहारांची चौकशीची टिळेकरांची मागणी; कारवाई करण्याचे मंत्री अतुल सावे यांचे आश्वासन

Alandi News : पुरामुळे नुकसान झालेल्या नागरी सुविधांसाठी आळंदीला 10 कोटींचा निधी मंजूर

SCROLL FOR NEXT