पुणे

अनियमित पाणीपुरवठ्याने दळवीनगरकर त्रस्त

सकाळवृत्तसेवा

पिंपरी -  महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून अनियमित आणि कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे चिंचवड- दळवीनगरमधील सोनवणे चाळ, पांढरकर चाळ, समर्थ कॉलनी परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून हा प्रकार सुरू असून, प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना होत नसल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. 

गेल्या काही महिन्यांपासून पाणी समस्या आहे. या संदर्भात या परिसराला भेट दिली असता, नागरिकांनी पाणीपुरवठा विभागाबाबत तक्रारींचा पाढाच वाचला. 

येथील रहिवासी बाळू सोनवणे म्हणाले, ‘‘गेल्या वर्ष-दीड वर्षापासून पाण्याचा प्रश्‍न आहे. सकाळी सहा वाजता पाणी येते. साडेसातनंतर पाणी मिळत नाही. पाण्याअभावी दसऱ्यानिमित्त साफसफाईची कामेही करता आली नाहीत.’’ 

प्रीती गुजराथी म्हणाल्या, ‘‘पाणी कमी दाबाने येते. कधी-कधी गढूळ पाण्याचा पुरवठा होतो. महापालिकेच्या वतीने काही वेळेस पाणीपुरवठ्याबाबत कोणतीही सूचना न देता तो बंद करण्यात येतो. त्यामुळे गैरसोय होते.’’ 

सुरेश चव्हाण म्हणाले, ‘‘समर्थ कॉलनीत सुमारे १५ इमारती आहेत. बहुतेक इमारतीत दहापेक्षा जास्त सदनिका आहेत. पाण्याच्या कमतरतेमुळे महिन्यातून प्रत्येकाला पाण्यासाठी किमान दोन-चार वेळा टॅंकर मागवावे लागतात.’’ 

लक्ष्मण ढोरे, कृष्णाबाई तापकीर, बशीर शेख यांनीही पाणीपुरवठ्याबद्दल तक्रारी केल्या. या संदर्भात महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाशी संपर्क होऊ शकला नाही. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs NZ: न्यूझीलंडने इंग्लंडला १६० धावांनी चिरडले, कसोटी मालिका २-१ ने खिशात

Maharashtra politics: मोठी राजकीय घडामोड! विरोधकांनी म्यान केल्या तलवारी; आमदार संजना जाधव यांना बिनशर्त पाठिंबा, कन्नड डीसीसी बँक निवडणुकीत ट्विस्ट

Latest Marathi News Live Update : उत्तर प्रदेशातील कासगंज येथे प्रशिक्षणार्थी विमान कोसळलं, पायलट जखमी

Pune Death Penalty: पुण्यातील फाशीच्या शिक्षांचा इतिहास; गाजलेल्या गुन्ह्यांपासून नसरापूर प्रकरणापर्यंत कठोर न्यायाची परंपरा

Bhambavli Vajrai Waterfall : भारतातील सर्वात उंच धबधबा पर्यटकांसाठी सज्ज! वजराई धबधब्याचे 'अक्राळविक्राळ' रूप पाहण्यासाठी देश-विदेशातून उत्सुकता, हंगामाची तयारी सुरू

SCROLL FOR NEXT