अनाधिकृत झोपड्यांवर पाटबंधारे विभागाची कारवाई सुरू sakal
पुणे

हडपसर : अनाधिकृत झोपड्यांवर पाटबंधारे विभागाची कारवाई सुरू

या सुमारे तीनशेच्यावर झोपड्यांवर ही कारवाई

कृष्णकांत कोबल

हडपसर : येथील औद्योगिक वसाहती मागील मुठा कालव्यालगत दोन्हीही बाजूने नव्याने होत असलेल्या व काही महिन्यांपूर्वी झालेल्या अतिक्रमणांवर पाटबंधारे विभाग व पालिकेने संयुक्तपणे कारवाई सुरु केली आहे. या सुमारे तीनशेच्यावर झोपड्यांवर ही कारवाई होत आहे. पाच जेसीबी, डंपर तसेच पाटबंधारे विभाग, पालिका व पोलीस असे सुमारे चारशे कर्मचारी ही कारवाई करीत आहेत.

येथील पाटबंधारे विभागाच्या मोठ्या मोकळ्या जागेवर ही अतिक्रमणे झालेली आहेत. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ही कारवाई चालू झाली आहे. मागील महिन्यातही येथे कारवाई करण्यात आली होती. मात्र, पुन्हा याठिकाणी नव्याने झोपड्या बांधल्या जात होत्या.

खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील, पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे, दिगंबर शिंदे, राजू अडागळे यांच्या नेतृत्वाखाली तीनही विभागातील सुमारे चारशे कर्मचारी या कारवाईत सहभागी झाले होते. कारवाई सुरू होताना झोपडपट्टीधारक व पोलिसांमध्ये झटापट झाली. त्यावेळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Army New Uniform: भारतीय लष्कराचा मोठा बदल! ८ वर्षांनंतर नवा ड्रेस कोड लागू; ब्रिटिशकालीन परंपरांना रामराम, आर्मीचा 'देसी' लूक चर्चेत

Matheran Toy Train: माथेरानची राणी ४ महिने बंद, नवी सेवा सुरू होणार; मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, कधीपासून आणि का?

Manoj Jarange Support : तुकाराम मुंढेंची बदली कराल तर... मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा

Latest Live Updates Marathi: गृह लक्ष्मी' आणि 'गृह ज्योती' यांसारख्या जनहितार्थ असलेल्या गॅरंटी योजना बंद केल्या जाणार नाहीत- शिवकुमार

Protein-Packed Boiled Peanut Chaat: प्रोटीनचा खजिना, चवीतही नंबर वन! संध्याकाळच्या नाश्त्यासाठी बनवा उकडलेल्या शेंगदाण्यांचा हेल्दी चाट

SCROLL FOR NEXT