पुणे

इसबावीतील नगर भूमापनाचे प्रारूप नकाशे प्रसिद्ध; हरकतींसाठी २९ ऑक्टोबरपर्यंत मुदत

CD

इसबावीतील नगर भूमापनाचे प्रारूप नकाशे प्रसिद्ध

हरकतींसाठी २९ ऑक्टोबरपर्यंत मुदत; सक्षम अधिकाऱ्यांकडून होणार तपासणी

पंढरपूर, ता. १६ : केंद्र शासनाच्या डिजिटल इंडिया भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या नकाशा पथदर्शी प्रकल्पामध्ये पंढरपूर नगरपरिषदेचा समावेश करण्यात आला आहे. या प्रकल्पांतर्गत पंढरपूर नगरपरिषद हद्दीतील इसबावी येथील मिळकतींचे आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने नगर भूमापन करून नकाशे व संबंधित भूमी अभिलेख तयार करण्याचे काम करण्यात आले आहे.
या कामाच्या अनुषंगाने इसबावी येथील नगर भूमापनाचे प्रारूप नकाशे व प्रारूप चौकशी नोंदवही १४ ऑक्टोबर रोजी नागरिकांच्या अवलोकनार्थ प्रसिद्ध करण्यात आली आहे. या प्रक्रियेमुळे मिळकतींच्या हद्दी, क्षेत्रफळ व संबंधित नोंदींची पडताळणी करण्याची संधी मिळकतधारकांना उपलब्ध झाली आहे. प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप नकाशांमध्ये किंवा चौकशी नोंदवहीमध्ये मिळकतीच्या हद्दी, क्षेत्रफळ, नोंदी अथवा इतर बाबींबाबत काही हरकत किंवा दुरुस्ती असल्यास संबंधित मिळकतधारकांनी आवश्यक कागदपत्रांसह लेखी हरकत २९ ऑक्टोबर २०२६ पर्यंत सादर करावी.
हरकती नगररचना विभाग, पंढरपूर नगरपरिषद, पंढरपूर तसेच उपअधीक्षक, भूमी अभिलेख, पंढरपूर यांचे कार्यालय येथे सादर करता येतील. मुदतीत प्राप्त झालेल्या हरकतींची संबंधित सक्षम अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात येईल. आवश्यकतेनुसार हरकतदारांना सुनावणीची संधी देऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले जाईल. संबंधित कागदपत्रे व अभिलेखांची पडताळणी केल्यानंतर नियमानुसार निर्णय घेऊन आवश्यक दुरुस्त्या करण्यात येतील. नकाशा प्रकल्पाचा उद्देश शहरी भागातील भूमी अभिलेखांचे आधुनिकीकरण करणे, जीआयएस आधारित अचूक नकाशे तयार करणे आणि शहरी नियोजनासाठी अद्ययावत माहिती उपलब्ध करून देणे हा असल्याचे भूमी अभिलेख उपाधीक्षक पूजा अवताडे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Farmer Scheme: शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार! सरकारकडून 5,000 रुपये मिळणार; कसा कराल अर्ज?

US School Shooting: अमेरिकेत प्राथमिक शाळेत गोळीबाराचा थरार; तीन चिमुरड्यांसह चार जणांचा मृत्यू

कपिल देव यांचा Gen Z ला सल्ला; CJP च्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे विधान; म्हणाले, युवा पिढी नेहमीच बरोबर नसते...

Sangli DCC Bank Election : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; अर्ज वैध ठरताच केली 'ही' पोस्ट, विरोधकांचे राजकीय डावपेच धुळीला..

Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकरांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; सांगली जिल्हा बँक निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा

SCROLL FOR NEXT