पुणे

इस्लामपूर येथे महाराजस्व समाधान शिबीर संपन्न

CD

MLS26B02641
माळशिरस ः महाराजस्व समाधान शिबिरप्रसंगी जि. प. सदस्य गौतम माने, पं. स. सदस्य आनंद शेंडगे, अधिकारी, नागरिक.

इस्लामपूर येथे राजस्व अभियानात ३८६ अर्ज
माळशिरस, ता. १५ : इस्लामपूर मंडळ स्तरावर आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ अभियानांतर्गत झालेल्या शिबिरात विविध योजनांसाठी एकूण ३८६ अर्ज प्राप्त झाले. यामध्ये निकाली फेरफार २७, सातबारा दुरुस्ती १७, डिजिटल सातबारा ९२, आठ-अ २७, जात प्रमाणपत्र २५, नॉनक्रिमीलेयर ५, उत्पन्न दाखले ३०, रहिवासी प्रमाणपत्र २४, वारस नोंद १७, सामाजिक अर्थसहाय्य १३, नवीन शिधापत्रिका १३, पीएम किसान योजना २९, फार्मर आयडी ११, आरोग्य तपासणी ३४ आदी सेवांचा समावेश असून काही प्रमाणपत्रांचे तत्काळ वाटप करण्यात आले.

नागरिकांच्या समस्या तात्काळ सोडविणे तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने हे शिबिर श्री संभाजीबाबा विद्यालय, इस्लामपूर येथे पार पडले.
यावेळी जि. प. सदस्य गौतम माने, पंचायत समिती सदस्य आनंद शेंडगे, बाबासाहेब माने, महसूल नायब तहसीलदार सिद्धनाथ जावीर, पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार रविकिरण शेट्टे, मंडळ अधिकारी सुभाष रणदिवे, संदीप कोळेकर, अमोल खेडकर, पांडुरंग गेजगे, सोपान गुंजाळ, धर्मेश खटके, सचिन कराळे, सरपंच नितीन नलवडे, उपसरपंच कैलास पवार, पोलिस पाटील नितीन पाटील तसेच विविध विभागांचे अधिकारी व नागरिक उपस्थित होते.
प्रास्ताविक सचिन कराळे यांनी केले, तर सूत्रसंचालन संतोष महामुनी यांनी केले. पंचायत समिती सदस्य आनंद शेंडगे यांनी महसूल विभाग अधिक लोकाभिमुख व गतिमान करण्यासाठी अशा शिबिरांचे आयोजन उपयुक्त ठरत असल्याचे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Officers Transfers: महाराष्ट्रात पोलीस दलात मोठा फेरबदल! २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदली; कुणाची कुठे नेमणूक? जाणून घ्या यादी...

IPL 2026 Point Table: गुजरात टायटन्सने विजय मिळवून PlayOff ची चुरस अधिक रंजक बनवली; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर सहज मात

HSC Result: मोठी बातमी! महाराष्ट्र बोर्डाच्या १२वी निकालाची तारीख जाहीर, कधी आणि कसा पाहता येणार? जाणून घ्या संपुर्ण प्रक्रिया

GT vs RCB Live: एवढा राग...! शुभमन गिलची कॅच घेतल्यावर विराट कोहलीने काय केलं? त्याच्याकडून अशी अपेक्षा नव्हती Video Viral

Pune News : पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर; पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीणमधील ३२ अधिकारी, अंमलदारांचा समावेश

SCROLL FOR NEXT