तळेगाव ढमढेरे : रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथील एमआयडीसीत विविध कंपन्या कोरोनाबाधीत कामगारांच्या उपचारासाठी लवकरच विलगीकरण सेंटर उभारणार असून, त्यासाठी कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी कामगार आयुक्त व कंपनी प्रशासनाला तात्काळ कार्यवाही करण्याची सूचना दिली असल्याची माहिती आंबेगाव - शिरुर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर यांनी सांगितली.
एमआयडीसीतील कंपन्यांत उभारण्यात येणारे विलगीकरण सेंटर हे राज्यासाठी आदर्श मॉडेल ठरणार असल्याचे पाचुंदकर यांनी सांगितले. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमिवर रांजणगाव एमआयडीसीतील कंपन्यांनी आपल्या कामगारांच्या सुरक्षीततेसाठी विलगीकरण कक्ष उभारण्याची सूचना मंत्री वळसे पाटील यांनी कामगार आयुक्त व कंपन्याच्या अधिकाऱ्याना नुकतीच दिली होती. त्या संदर्भात नुकतीच ऑनलाइन बैठक झाली. यावेळी कामगार आयुक्त शैलेंद्र पोळ, कामगार उपायुक्त विकास पनवेलकर, कामगार विभागाचे अप्पर संचालक वि.मा. यादव व आंबेगाव - शिरुर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष मानसिंग व एमआयडीसीतील बहुतांश कंपन्याचे प्रतिनिधी उपस्थित होते.
पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
यावेळी एमआयडीसीतील फियाट, एल.जी, हायर, आयटीसी व व्हर्लपूल या प्रमुख कंपन्यानी आपल्या सामाजिक दायित्व निधीतून हे सेंटर उभारण्यास सहमती दर्शविली असल्याचे पाचुंदकर यांनी सांगितले.
कंपनीत कोरोना विषाणूने संसर्गित झालेल्या आणि कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या कामगारांना कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कंपन्यांनी उभारलेल्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे. यामूळे कंपनीतील अन्य कामगार व संबंधित कामगारांचे कुटुंब सुरक्षित राहण्यास मदत होणार आहे. या विलगीकरण सेंटरमध्ये कोरोना बाधित कामगारांना निवास व्यवस्था, स्वतंत्र शौचालय, नाष्टा, जेवण, पिण्याचे पाणी, थर्मामिटर, ऑक्सिमिटर, ऑक्सिजन सिलेंडर व रुग्णवाहिका आदी सुविधा सामाजिक दायित्व निधीतून संबंधित कंपन्या उपलब्ध करुन देणार आहेत. या कक्षामुळे कोरोना बाधित कामगारांना वेळेत उपचार मिळणार असून, एमआयडीसीतील इतर कंपन्यांनी विलगीकरण सेंटर उभारण्यासाठी पुढाकार घ्यावा व कामगारांचे आरोग्य अबाधित ठेवावे असे आवाहन पाचुंदकर यांनी केले आहे.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.