पुणे

इस्राईलमध्ये सरकार स्थापनेबाबत अनिश्चितता

CD

तेल अविव, ता.३० (पीटीआय) : इस्राईलच्या २०२६ मधील सार्वत्रिक संसदीय निवडणुकीची मतमोजणी पूर्ण झाली असून, पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या उजव्या विचारसरणीच्या आघाडीला ५३ जागा मिळाल्या आहेत. सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेल्या ६१ जागांच्या बहुमतापासून ही आघाडी दूर राहिली आहे. केंद्रीय निवडणूक समितीने (सीईसी) आज पहाटे जाहीर केलेल्या अंतिम निकालात ही माहिती देण्यात आली
इस्राईलच्या १२० सदस्यीय संसदेत (नेसेट) नेतान्याहू यांच्या लिकुड पक्षाच्या नेतृत्वाखालील आघाडीला ५३ जागा मिळाल्या आहेत, तर विरोधी पक्षांच्या आघाडीने ४८ जागा जिंकल्या आहेत. दोन्ही आघाड्यांना स्पष्ट बहुमत मिळविता आलेले नसल्याने १९ जागा जिंकणारे अरब पक्ष सत्तास्थापनेत निर्णायक भूमिका बजावण्याची शक्यता आहे. मात्र अरब पक्षांशी सहकार्य करण्यास नेतान्याहू यांनी नकार दिल्यामुळे सरकार स्थापनेचा पेच आणखी वाढला आहे. नव्या सरकारची स्थापना करण्यात अपयश आल्यास इस्राईलमध्ये पुढील वर्षाच्या सुरुवातीला पुन्हा निवडणूक होण्याची शक्यताआहे.
विरोधी आघाडीत गादी आयझेनकोट यांच्या याशार पक्षाला २१, नफ्ताली बेनेट यांच्या बियाखाद पक्षाला १२, येर गोलान यांच्या डेमोक्रॅट्स पक्षाला आठ आणि अविग्दोर लिबरमन यांच्या इस्राईल बेतेनू पक्षाला सात जागा मिळाल्या आहेत. अरब नेतृत्वाखालील राअम आणि संयुक्त यादी या पक्षांना अनुक्रमे ११ आणि आठ जागा मिळाल्या आहेत.

अरब पक्षांशी युती नाही’
नेतान्याहू यांनी शुक्रवारी अरब राजकीय नेते आणि विरोधी पक्षांच्या सदस्यांच्या वक्तव्यांचा एक व्हिडिओ प्रसारित केला. अरब पक्षांबरोबर सरकार स्थापन करण्यास विरोध असल्याचे पुन्हा स्पष्ट करताना, ‘त्यांच्याशी सरकार स्थापन करण्यास मनाई आहे,’ असे त्यांनी म्हटले. या व्हिडिओतील अरब नेते पॅलेस्टिनी प्रश्नाच्या समर्थनार्थ बोलताना दिसतात. उजव्या विचारसरणीच्या ज्यू पक्षांना ही भूमिका देशविरोधी वाटते.

आयझेनकोट यांना प्रस्ताव
नेतान्याहू यांचे मित्रपक्ष असलेल्या संयुक्त तोराह ज्युडिझम पक्षाने विरोधी पक्षनेते गादी आयझेनकोट यांना पंतप्रधान करण्याचा प्रस्ताव दिला आहे. या पक्षाला निवडणुकीत सात जागा मिळाल्या आहेत. संयुक्त तोराह ज्युडिझम पक्षाने आयझेनकोट यांच्या सरकारमध्ये सहभागी न होता बाहेरून पाठिंबा देण्याची तयारी दर्शविली आहे. त्यानुसार, सरकारविरोधातील मतदानाच्या वेळी पक्ष विरोधात मतदान करण्याऐवजी तटस्थ राहू शकतो. त्यामुळे आयझेनकोट यांना संसदेत सरकार चालविण्यासाठी आवश्यक पाठबळ मिळू शकते.

नेतान्याहूविरोधी आघाडीचा विजय
इस्राईलचे विरोधी पक्षनेते आणि बियाचाद पक्षाचे दुसऱ्या क्रमांकाचे नेते यायर लापिड यांनी निवडणूक निकालानंतर नेतान्याहूंविरोधी बहुमताचा विजय झाल्याचे जाहीर केले. पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याकडे सरकार स्थापन करण्याचा कोणताही व्यवहार्य मार्ग नसल्याचा दावा त्यांनी केला. त्याचवेळी, आघाडी स्थापनेच्या वाटाघाटी सुरू होत असताना समर्थकांनी संयम राखावा, असे आवाहनही त्यांनी केले.लापिड यांनी शुक्रवारी ‘एक्स’वरील सविस्तर पोस्टमध्ये आपल्या गटाला स्पष्ट बहुमत मिळाले नसल्याचे मान्य केले. मात्र, मतदानाची टक्केवारी आणि नेतान्याहू यांच्या आघाडीला मिळालेल्या जागांची संख्या लक्षात घेता हा निकाल राजकीय विजय असल्याचे त्यांनी म्हटले.

-----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Helicopter Crash: धक्कादायक! बद्रीनाथहून परतणारे हेलिकॉप्टर कोसळले; पायलटसह ६ जणांचा मृत्यू

अर्शदीप सिंगचा वर्ल्ड रेकॉर्ड! IND vs NZ 4th T20I मध्ये फिलिप्सनेही नोंदवले एकापेक्षा एक सरस विक्रम

WhatsApp मध्ये मोठा बदल! आता प्रोफाइलला लावता येणार Cover Photo; मिळणार Facebook सारखा लूक

Marathi News Live Updates : बेस्ट कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट; ३ नोव्हेंबरला मिळणार बोनस

'ये सिर्फ कपड़ा नहीं, अभिमान है'; श्रद्धा कपूरच्या 'ईठा'चा ट्रेलर प्रदर्शित, विठाबाईंच्या भूमिकेतील लूक पाहून चाहते थक्क!

SCROLL FOR NEXT