Crime sakal
पुणे

Pune Crime : इस्राईल-हमास युद्धाचे पुण्यात पडसाद; दंगल घडविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

इस्राईल-हमास देशात सुरू असलेल्या युद्धाची प्रतिक्रिया पुण्यातही उमटली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - इस्राईल-हमास देशात सुरू असलेल्या युद्धाची प्रतिक्रिया पुण्यातही उमटली आहे. काही समाजकंटकांकडून शहरातील रस्त्यांवर इस्राईलच्या राष्ट्रध्वजाची प्रतिकृती असलेले स्टीकर चिकटवून दंगल घडविण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. परंतु पोलिसांनी वेळीच हा प्रकार हाणून पाडला. या प्रकरणी लष्कर, समर्थ आणि खडक पोलिस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅम्प परिसरातील कुरेशी मस्जिद ते भोपळे चौकादरम्यान रस्त्यावर इस्राईलच्या राष्ट्रध्वजाची प्रतिकृती असलेले स्टीकर चिकटवल्याचे आढळून आले. याबाबत पोलिस हवालदार निवास केंजळे यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून लष्कर पोलिस ठाण्यात सहा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

न्यू नाना पेठ आणि इनामदार चौकातही असाच प्रकार उघडकीस आला. येथील रस्त्यावर इस्राईलच्या राष्ट्रध्वजाची प्रतिकृती असलेले स्टीकर चिकटविण्यात आले होते. रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांची आणि वाहनांची ये-जा झाल्यानंतर चिथावणी देवून दंगल घडवून सामाजिक स्वास्थ्य बिघडविण्याचा काही लोकांचा उद्देश होता.

खडक पोलिस ठाण्याच्या हद्दीतही चुडामण तालीम चौक ते भवानी पेठदरम्यान रस्त्यावरही अशा स्वरुपाचा प्रकार उघडकीस आला. याबाबत पोलिस उपनिरीक्षक अभिजित दत्तात्रेय पवार यांनी फिर्याद दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT