पुणे

इस्राईलच्या माऱ्यात दोन म्होरके ठार

CD

तेल अविव, ता. १६ (एएनआय) : इस्राईलने आज पहाटे दक्षिण लेबनॉनमध्ये हवाई हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये हिज्बुल्ला या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अबु हसन आला हा मारला गेल्याचा दावा इस्राईलच्या संरक्षण मंत्रालयाने केला आहे. इस्राईलच्या सैन्याविरोधात हल्ल्याचे अनेक कट अबु हसन आला यानेच रचले होते, असा इस्राईलचा आरोप आहे.
इस्राईलने शनिवारी हिज्बुल्लाच्या मुख्यालयावर लक्ष्यवेधी हल्ला केला होता. त्या हल्ल्यात अली समीर अल हज हसन हा एक म्होरक्या मारला गेला होता. त्यानंतर आज लगेचच दुसरा हल्ला करण्यात आला. हिज्बुल्लाने केलेल्या हल्ल्यात इस्राईलचे तीन सैनिक जखमी झाले होते. त्याचा सूड म्हणून हे दोन हल्ले केल्याचा दावा इस्राईलच्या संरक्षण मंत्रालयाने केला. ‘‘हिज्बुल्लाचे दहशतवादी स्वत:च्या बचावासाठी आपल्याच कुटुंबीयांचा मानवी ढाल म्हणून वापर करत आहेत. तसेच, त्यांनी आपले तळ आणि लपण्याची ठिकाणे जाणीवपूर्वक नागरी वस्त्यांमध्ये उभारली आहेत. त्यामुळेच लक्ष्याधारित हल्ले केले,’’ असे मंत्रालयाने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke MPSC : धर्म-जातीच्या नावावर मत मागता, पण शिक्षणाचं काय?’; पुण्यातील एमपीएससी आंदोलनात अभिजीत दिपकेंचा सवाल

GST Council : GSTचे नियम बदलणार? 9 गुन्हे वगळण्याचा प्रस्ताव, अटक प्रक्रियेतही मोठी सुधारणा होण्याची शक्यता

IND vs WI, Schedule: वनडे मालिका संपली, आता ५ सामन्यांची T20I मालिका होणार सुरू; संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

किटलीशिवाय कप-बशी भरणार नाही; शिट्टीपासून सावध राहा; सोमेश्वर निवडणुकीत युगेंद्र पवारांचे सूचक आवाहन

SCROLL FOR NEXT