पुणे

कवठे शेतकरी उत्पादक कंपनीस इस्राईलच्या कृषी अधिकाऱ्यांची भेट

CD

इस्राईलच्या कृषी अधिकाऱ्यांची कवठेस भेट

आधुनिक शेती पद्धतीची पाहणी; शेतकऱ्यांकडून घेतली माहिती

कवठे, ता. २५ : जिल्ह्यातील शेती क्षेत्रात प्रगत प्रयोगांसाठी ओळखल्या जाणाऱ्या कवठे गावातील कवठे कृषी क्रांती शेतकरी उत्पादक कंपनीला इस्राईल येथील कृषी विभागातील वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांनी भेट दिली. तेथील आधुनिक शेती पद्धतीची त्यांनी पाहणीही केली.

प्रगतशील शेतकरी अतुल डेरे यांनी राबविलेल्या गटशेती, ठिबक सिंचन, ऑटोमेशन आणि मिश्र पीक पद्धतीची प्रतिनिधींनी माहिती घेतली. उत्पादनवाढीसाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर कसा केला जातो, याची प्रत्यक्ष शेतावर पाहणी केली.
या प्रतिनिधी मंडळात इस्राईल कृषी विभागाच्या प्रमुख ओरित गुतेन्मान, ऑर्बिया समूहातील वरिष्ठ अधिकारी माया पेरी, एलिट हेर्शको यांचा समावेश होता.
यावेळी कंपनीने हळद पिकावरील प्रक्रिया उद्योगाची माहिती देत मूल्यवर्धनाचे उपक्रम सादर केले. कृष्णाई शेती उद्योग येथे केळी, पपई, आले, टरबूज आदी पिकांची लागवड व व्यवस्थापनाबाबत माहिती दिली.

भेटीदरम्यान नेटाफिम कंपनीचे संचालक अमित करंदीकर, राजकुमार माळी, तुषार कारंडे, देवेंद्र कस्तुरे, केदार मुळे, अतुल हिंगमिरे आदी उपस्थित होते.
यावेळी कंपनीचे संचालक मधुकर डेरे, अतुल डेरे, वाई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राहुल डेरे, प्रवीण पोळ, प्रमोद डेरे, संतोष डेरे, संतोष घाडगे, सुनील डेरे, सौरभ पोळ, अजय चव्हाण, विक्रम डेरे, आनंदराव डेरे, प्रवीण काकडे, प्रकाश चव्हाण, दीपक गुरव आदी उपस्थित होते.

..........
चाैकट
........

तंत्रज्ञानाशी जोडण्याची संधी...

इस्राईलसारख्या प्रगत कृषी तंत्रज्ञान असलेल्या देशातील अधिकाऱ्यांनी कवठे येथील शेती प्रयोगांचे कौतुक करत भविष्यात तांत्रिक सहकार्य वाढविण्याबाबत सकारात्मक चर्चा केली. या भेटीमुळे स्थानिक शेतकऱ्यांना जागतिक पातळीवरील तंत्रज्ञानाशी जोडण्याची नवी संधी उपलब्ध होणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
.............

कवठे ः शेतीची पाहणी करताना इस्राईलच्या कृषी अधिकारी.
...........................................................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajya Sabha : भाजपचे राज्यसभेचे उमेदवार ठरले, १० नेत्यांची नावे चर्चेत; यादी दिल्लीला पाठवली, कुणाला संधी?

Krishnaraj Mahadik Political Journey : स्पोर्ट्समन, युट्यूबर ते राजकारणी खासदार धनंजय महाडिक पुत्र कृष्णराजचा राजकीय प्रवास

Latest Marathi News Live Update : लासलगावमध्ये शेतकऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडले

पवारांच्या राज्यसभेसाठी लेकीची फिल्डिंग! संजय राऊतांशी चर्चा, खर्गे आणि उद्धव ठाकरेंना भेटणार सुप्रिया सुळे

Toll tax on Indian Army: भारतात सैनिकांना टोल टॅक्समधून सूट मिळते का? जाणून घ्या नियम काय सांगतो

SCROLL FOR NEXT