kirkee-traffic 
पुणे

#PuneFlood ‘आयटी’ कर्मचाऱ्यांचे घरूनच काम

सकाळ वृत्तसेवा

पुणे - पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये सुरू असलेला पाऊस व नद्यांना मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्यामुळे हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशनने (एचआयए) ‘आयटी’ कंपन्यांमधील बहुतांश कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याच्या (वर्क फ्रॉम होम) सूचना दिल्या होत्या. त्यामुळे सोमवारी सुमारे ६० टक्के आयटी कर्मचाऱ्यांनी घरून काम करण्याचा पर्याय निवडला. आज कामावर गेलेल्या उर्वरित ४० टक्के कर्मचाऱ्यांना कंपन्यांनी दुपारीच घरी सोडले.

पुणे व पिंपरी-चिंचवडमधील पूरस्थितीमुळे कर्मचाऱ्यांना प्रवास करण्यात येणाऱ्या अडचणींचा ‘एचआयए’ने विचार केला. त्यानुसार, संघटनेच्या सदस्य असणाऱ्या बहुतांश कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’च्या सूचना देण्यात आल्या. त्यामुळे आज बहुतांश कर्मचाऱ्यांनी घरूनच काम करण्यास  पसंती दिली. 

दरम्यान, काही कर्मचारी कंपनीच्या बस, खासगी कार, दुचाकी व अन्य वाहनांनी कामासाठी हिंजवडीमध्ये निघाले होते. परंतु, औंधमध्ये आल्यानंतर पूल बंद झाल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यामुळे त्यांना वरिष्ठांनी घरी जाऊन काम करण्याच्या सूचना दिल्या. कंपनीमध्ये पोचलेल्या कर्मचाऱ्यांना घरी जाण्यात अडचण येऊ नये, यासाठी काही कंपन्यांनी त्यांना दुपारनंतर घरी जाण्यास सांगितले.

सकाळी नेहमीप्रमाणे हडपसर येथून पिंपरीत आयटी कंपनीत मी कामावर निघाले. दुपारी पुरामुळे शहरातील बरेचसे पूल बंद झाल्याचे कळले. त्यामुळे कंपनीने दुपारी तीन वाजता सुटी दिली. 
- मेघा काकडे, संगणक अभियंता 

कंपनीने घरूनच काम करण्याचे निर्देश दिले होते. मी लोहगावमध्ये राहतो, तर माझी कंपनी हिंजवडीमध्ये आहे. औंधमधील पूल बंद असल्याने मी आज घरूनच काम केले.
- जयंत निखारे, संगणक अभियंता

रस्ते बंद, वाहतूक कोंडी आणि वाढलेला पाऊस, यामुळे निम्म्या रस्त्यावरून मी घरी परतले. त्यामुळे आज मी घरून काम केले. 
- प्रियांका गांधी, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI BR Gavai Retirement Plan: सरन्यायाधीश बी.आर.गवईंनी सांगितला 'रिटायरमेंट' नंतरचा प्लॅन, म्हणाले 'मी कोणतंही...'

Student Video: बोटांमध्ये चावी फिरवत वर्गातून बाहेर पडली, नंतर थेट मुलीनं शाळेत चौथ्या मजल्यावरून उडी मारली, पाहा थरारक व्हिडिओ

Walmik Karad: ''धनंजय मुंडेंना आयुष्यातून उठवून मंत्रिपदाची शपथ घेणार होता वाल्मिक कराड'', बाळा बांगरचा रेकॉर्डिंग बॉम्ब

IND vs ENG 4th Test: 'Root' मजबूत! जो रूटचे ३८वे शतक; भारतीय गोलंदाजांची घेतली शाळा, मोडले अनेक विक्रम

Latest Maharashtra News Updates : माणिकराव कोकाटे यांच्या समर्थनार्थ सिन्नरमध्ये शक्तीप्रदर्शन

SCROLL FOR NEXT