पुणे

‘परिवर्तनाशिवाय मुलींचा जन्मदर वाढणे अशक्‍य’

सकाळ वृत्तसेवा

पुणे - ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ असे म्हणत फक्त स्त्रियांचे प्रबोधन न करता पुरुषांची मानसिकता बदलणे गरजेचे आहे. पुरुष आणि महिलांच्या वर्तनाचे जोपर्यंत परिवर्तन होणार नाही, तोपर्यंत मुलींच्या जन्माचे दर वाढणार नाहीत, असे प्रतिपादन ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चे राष्ट्रीय संयोजक डॉ. राजेंद्र फडके यांनी केले. 

परिवर्तन महिला आधार केंद्राच्या वतीने कर्तृत्ववान महिलांना ‘जिजाऊ- सावित्रीच्या लेकी पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी डॉ. फडके बोलत होते.

‘बेटी बचाओ’ चळवळीचे प्रणेते डॉ. गणेश राख, भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विकास रासकर, नगरसेवक मारुती तुपे, स्वाती टेळे, उत्तम कामठे, रमजान शेख, संजय सातव, जीवन जाधव, सतीश भिसे, मसूद शेख, रतन माळी, सुधाकर राजे, प्रमोद परदेशी, स्वप्नील क्षीरसागर, सविता हिंगणे, अनुप गौड आदी उपस्थित होते.

राधा बोरोळे, सविता राजिवडे, आशा त्रिभुवन, शोभा जाधव, गौरी सूर्यवंशी, वर्षा ननावरे आदी कर्तृत्ववान महिलांचा ‘जिजाऊ- सावित्रीच्या लेकी’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

डॉ. फडके म्हणाले की, ‘पुणे तिथे, काय उणे’ असे म्हणत महाराष्ट्राला पुरोगामित्वाचा वसा आणि वारसा देण्याचे काम पुणे जिल्ह्याने केले आहे. महाराष्ट्रामध्ये बीड जिल्ह्यात मुलींचा जन्मदर सर्वांत कमी आहे, परंतु पुणे जिल्हासुद्धा त्याला अपवाद नाही. जिजाऊ- सावित्री यांचा वारसा सांगत असताना जगाला दृष्टी आणि सृष्टी देण्याचे कामसुद्धा स्त्रीशक्तीने केले आहे, त्यामुळे मुलींच्या जन्माचे स्वागत करा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक परिवर्तनाच्या संस्थापक शोभा  लगड यांनी, तर सूत्रसंचालन महेश टेळे व सुजाता गायकवाड यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RR vs CSK: सिक्स मारल्यानंतरही शिवम दुबेला कसं केलं आऊट? रवींद्र जडेजा म्हणाला, 'त्याला नेट्समध्ये गोलंदाजी केलीये, माहित होतं तो...'

RR vs CSK: वैभव सूर्यवंशीचा चेन्नईविरुद्ध झंझावात! विक्रमी अर्धशतक करत राजस्थानला मिळवून दिला 'रॉयल' विजय

लाडकी बहीण योजनेतून ७१ लाख महिला बाहेर, Ekyc साठी उरले फक्त २४ तास

IPL 2026: ७ वर्षे अन् २७७ सामने... CSK च्या बाबतीत पहिल्यांदाच घडली अशी घटना

खरात बोलतात तसं घडतं! माणिकराव कोकाटेंबद्दल तंतोतंत भविष्यवाणी केलेली; नामकर्ण आवारेंच्या पुस्तकात १३ पानं खरातवर

SCROLL FOR NEXT