पुणे

कुत्र्याला केली मदत अन् गेली आयटीची नोकरी!

वृत्तसंस्था

पुणे : कुत्र दिसलं की अनेकदा काहीजण घाबरतात तर काहीजण त्याच्याजवळ जातात. असाच एक प्रकार झाला तो पुण्यातील आयटी पार्क असलेल्या हिंजवडीमध्ये. कंपनीच्या परिसरात येणाऱ्या श्वानांसाठी झटणे एका आयटी अभियंत्याला चांगलेच महागात पडले आहे. कंपनीने संबंधित अभियंत्याला थेट कामावरुनच काढून टाकले आहे. त्यामुळे आता अभियंत्याने कंपनीला कायदेशीर नोटीस बजावली आहे.

हिंजवडीतील इन्फोसिस या आयटी कंपनीत विक्रम शिबाद हे कामाला होते. शिबाद आणि त्यांचे सहकारी तेथील कंपनीच्या परिसरातील भटक्या कुत्र्यांना खायला द्यायचे. मात्र, कंपनीच्या सुरक्षारक्षकांकडून या कुत्र्यांना अनेकदा मारहाण करण्यात आली. तसेच त्यांना कंपनीच्या परिसरात येण्यापासून मज्जावही करण्यात आला होता. सुरक्षारक्षकांकडून श्वानांना अनेकदा मारहाण होत असल्याने शिबाद यांनी मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये पशुसंवर्धन अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार केली होती.

त्यानंतर या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले. सुरक्षारक्षकाने कंपनीकडे शिबाद यांच्याविरोधात तक्रार केली. या तक्रारीनंतर कंपनीने शिबाद यांना नोटीस देत 22 एप्रिलला कामावरुन काढून टाकले.

दरम्यान, कंपनीच्या या कारवाईविरोधात शिबाद यांनी कंपनीला कायदेशीर नोटीस पाठवली असून, बडतर्फ मागे घेऊन त्याचे रुपांतर राजीनाम्यात करण्याची मागणी त्यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : पुणे-बंगळुरू महामार्गावर मोठी कोंडी; पुण्याहून कोल्हापूरला जाणारी वाहतूक संथ गतीने

Lok Sabha Election: ठाणे लोकसभा शिवसेनेचीच, नरेश म्हस्के यांना उमेदवारी! श्रीकांत शिंदेंचेही नाव कल्याणमधून जाहीर

Viral Video: पत्नी जावायाच्या प्रेमात पडल्याचे कळताच पतीने लावून दिले लग्न, टाळ्यांच्या कडकडाटात गावानेही केले स्वागत

Mazi Tuzi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ'चा हिंदी रिमेक प्रेक्षकांच्या भेटीला; मालिकेत करण्यात आले 'हे' बदल

Abhijeet bhattacharya: "लग्नात गाणं गायल्यानं औकात कमी होते", म्हणणाऱ्या अभिजीत भट्टाचार्यांना गायकानं व्हिडीओ शेअर करत दिलं सडेतोड उत्तर

SCROLL FOR NEXT