पुणे

आयटी पार्कच्या ५० एकराची आज मोजणी

CD

संग्रहित फोटो :PNE26W40786
---------------
आयटी पार्कच्या ५० एकराची आज मोजणी
होटगी तलावाच्या सांडव्याकडील जागा निश्चित; मोजणी विनाशुल्क
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. ७ : सोलापूर-होटगी रोडवरील होटगी तलावाच्या सांडव्याजवळील ५० एकर जागा आयटी पार्कला दिली जाणार आहे. या जागेची मोजणी उद्या (शनिवारी) भूमिअभिलेख कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी करणार आहेत. आयटी पार्कच्या शासकीय जागेची मोजणी विनाशुल्क होणार असून तसे पत्र पाटबंधारे विभागाने ‘भूमिअभिलेख’ला दिले होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयामुळे सोलापूरमध्ये आयटी पार्क होत आहे. या निर्णयामुळे सोलापूर शहर-जिल्ह्यातील १६ अभियांत्रिकी महाविद्यालयांमधून दरवर्षी शिकून अभियंते होणाऱ्या अडीच हजार विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला. शनिवारी जागेची मोजणी झाल्यावर हद्दी-खुणा निश्चित होतील. त्यानंतर पाटबंधारे विभागाकडून ५० एकराची जागा हस्तांतरीत होऊन ७/१२ उताऱ्यावर ‘एमआयडीसी’चे नाव लागेल. एकूण जागेतील एक लाख ४० हजार हजार मीटर जागांवर प्लॉट पाडले जातील, बाकीची जागा रस्ते, स्ट्रिट लाईट, ड्रेनेज लाईनसाठी लागणार आहे. ही कामे करायला अंदाजे २५ कोटींचा खर्च (प्रती- स्क्वेअर मीटर १२६७ रुपये) होणार आहे. जागा ‘एमआयडीसी’ला हस्तांतरीत झाल्यावर तेथील विकासकामे तातडीने हाती घेतली जातील, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
---------------
कोट:
पाटबंधारे विभागाने दिलेल्या पत्रानुसार ‘भूमिअभिलेख’कडून आयटी पार्कच्या जागेची आज (ता. ८) मोजणी होणार आहे. मोजणी होऊन जागेचा नकाशा निश्चित झाल्यावर ती जागा ‘एमआयडीसी’ला हस्तांतरीत होईल. त्यानंतर तेथे रस्ते, स्ट्रिट लाईट, पाणी, ड्रेनेज अशी कामे होतील. ही कामे झाल्यावर प्लॉट पाडून इच्छुक उद्योजकांना जागा दिली जाणार आहे.
- शिवाजी राठोड, प्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी, सोलापूर
--------------------
चौकट
पाण्यासाठी बोअर; जागा प्रतिस्क्वेअर फूट १८० रुपयाला
होटगी तलावाजवळील एक लाख ४० हजार स्क्वेअर मीटरवर आयटी पार्क उभारली जाणार आहे. ही जागा पाटबंधारे विभागाकडून विनाशुल्क ‘एमआयडीसी’ला मिळाली. मोजणीही विनाशुल्कच होणार आहे. त्यामुळे आयटी उद्योजकांना प्रतिस्क्वेअर फूट जागा सुमारे १८० रुपयाला मिळणार आहे. दुसरीकडे येथील आयटी पार्कमधील उद्योगांसाठी तुर्तास बोअर मारून पाण्याची सोय करून दिली जाणार आहे. बाजूला मोठा तलाव असल्याने त्याठिकाणी मुबलक पाणी उपलब्ध आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Student Agitation : एमपीएससी विद्यार्थ्यांचा रविवारी एल्गार! एसएम जोशी पुलावर ठिय्या आंदोलनाचा इशारा

Pune News : पाझर तलावांचा साठा घटला; पाणी उपशावर निर्बंध, झेडपीच्या जलव्यवस्थापन समितीकडून अधिकाऱ्यांना निर्देश

Modi Cabinet: उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार? मोदींची दोन दिवसीय चिंतन बैठक कशासाठी?

हा तर दरोडा! कॅन्सरच्या २७०० रुपयांच्या औषधाची MRP २७ हजार, रुग्णांच्या लुटीवर अधिकारी गप्प का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

सुवर्णपदकासोबत भारतीय खेळाडूंना मिळाल्या ‘त्या’ बाहुल्यां नेमक्या कशासाठी दिली जाते ही खास भेट? जपानच्या रंजक परंपरेमागचं कारण काय?

SCROLL FOR NEXT