ratioan-grain 
पुणे

पिंपरी शहरात शिधापत्रिका नसलेल्या कुटूंबांनाही धान्य मिळण्याची अफवा

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - शहरात शिधापत्रिका नसलेल्या कुटूंबांनाही रास्त भाव दुकानांमधून मोफत धान्य मिळणार असल्याची अफवा पसरली आहे. 
 
बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शहरात पिंपरी (ज) , चिंचवड (अ) आणि भोसरी (फ) भागांसाठी शहर अन्नधान्य वितरण विभागाची कार्यालये आहेत. या तीनही कार्यालयांमध्ये एकूण सुमारे १ लाखांहून अधिक शिधापत्रिका धारकांची नोंद आहे. 

 राज्य शासनाकडून सध्या ज्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न ५९ हजार रुपये इतके आहे. त्यांनाच अगदी नाममात्र दराने गहू व तांदूळ उपलब्ध करून दिला जात आहे. 

 मात्र, आता ज्यांच्याकडे शिधापत्रिका नाहीत. अशा कुटूंबांनाही रास्त भाव दुकानांद्वारे मोफत धान्य दिले जाणार असल्याची अफवा पसरली आहे. विशेष म्हणजे, त्यासाठी जिल्हाधिकारी व तहसिलदार यांच्या नावाने विशिष्ट नमुन्यातील छापील अर्जही उपलब्ध केले गेल्याचे दिसून येत आहे. 

दरम्यान, विभागाचे परिमंडळ अधिकारी (अ व ज  विभाग) दिनेश तावरे यांनी आम्हाला त्या प्रकारच्या कोणत्याही सूचना देण्यात आलेल्या नसून ही केवळ अफवा असल्याचे म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dance Bar Rule: ऑर्केस्ट्रा आणि डान्स बार नियमांमध्ये मोठे बदल! अश्लील नृत्य करणाऱ्यांना आता नाही माफी; महाराष्ट्र विधानसभेचा मोठा निर्णय

Wari Prasthan 2026:आषाढी वारीसाठी पालखीचं प्रस्थान होतं म्हणजे नेमकं काय ? प्रस्थानत्रयी म्हणजे काय ?

Latest Marathi News Live Update : खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग केला कमी

तब्बल १८ वर्षांनी झी मराठीवर परत येतोय गाजलेला नायक; 'इच्छाधारी नागीण' मालिकेत साकारणार भूमिका, ओळखलंत का?

घरासमोरून अपहरण, २ हजार मृत्यूंचं गूढ अन्...; कोण होते 'सतलुज'चे खरे नायक जसवंत सिंह खालरा?

SCROLL FOR NEXT