rickshaw 
पुणे

Lockdown: रिक्षाचालकांच्या कुटुंबांवर शहरात उपासमारीची वेळ 

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - लॉकडाउनमुळे शहरातील सुमारे वीस हजार रिक्षांची चाके थांबली आहेत. त्याबरोबर त्यांच्या संसाराचा गाडाही थांबला आहे. उत्पन्न बंद झाल्याने रिक्षाचालकांच्या कुटुंबांवर अक्षरश: उपासमारीची वेळ आली आहे. 

शहरात 20 हजारांवर रिक्षा आहेत. पॅसेंजर, शेअर- ए रिक्षाचाही त्यात समावेश आहे. दररोज वेगवेगळ्या रस्त्यांवर रिक्षा धावत असतात. सद्यस्थितीत पन्नास टक्के रिक्षा कर्ज काढून खरेदी केल्या आहेत. तितक्‍याच रिक्षा "शिप' देऊन त्यावर रिक्षामालकांचा उदरनिर्वाह चालतो. मात्र, कोरोनामुळे संचारबंदी व लॉकडाउनचा कालावधी रिक्षाचालकांसाठी मरण यातना देणारा ठरतो आहे. रिक्षाचालकांवर दिवाळखोरीची वेळ आली आहे. अत्यावश्‍यक सेवेत त्यांचा समावेश होत नसल्याने त्यांना बाहेर पडणे मुश्‍कील झाले आहे. बहुतांशी रिक्षाचालकांकडे उदरनिर्वाहाचे दुसरे साधनही नाही. त्यामुळेही हजारो कुटुंबांवर जणू आर्थिक संकट कोसळले आहे. 

पुण्याच्या आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

रोजीरोटी बंद 
प्रत्येक रिक्षाचालकांचे कमीत कमी चार ते पाच जणांचे कुटूंब आहे. अनेकांकडे रेशनकार्डही नाहीत. त्यामुळे अक्षरश: उपासमार होत आहे. गेल्या वीस दिवसांपासून त्यांची रोजीरोटी बंद झाली आहे. रिक्षाचालकाचे हातावर पोट असल्याने लॉकडाउन संपल्याशिवाय त्यांच्यासमोर कोणताही माग नाही. 

""राज्य सरकारने सर्व वर्गातील कष्टकरी जनतेला मदत जाहीर केलेली आहे. यामध्ये रिक्षाचालकांना महिन्याकाठी पाच हजारांचा निधी जमा करावा. मे, जून महिन्यांसाठी विशेष पॅकेजची सोय करावी.'' 
- श्रीधर काळे, अध्यक्ष क्रांती रिक्षा सेना 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थाट... देवदत्त पडिक्कल, विराट कोहलीची दमदार फटकेबाजी; हैदराबादवर विक्रमी विजय

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

SCROLL FOR NEXT