PNE26W57100
---
राघव, उदित, संदेश
अन् काहीरची आगेकूच
आयटीएफ पुरुष टेनिस स्पर्धेची पात्रता फेरी
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. ११ : सोलापुरात सुरू असलेल्या एमएसएलटीए- एसडीएलटीए आयटीएफ पुरुष टेनिस स्पर्धेच्या पात्रता फेरीत राघव जयसिंघानी, उदित कंबोज, संदेश कुरळे आणि काहीर वारिक यांनी प्रतिस्पर्ध्यांवर मात करत आगेकूच केली. राघव आणि उदित यांनी सरळ सेटमध्ये विजय मिळवला, तर संदेशने तीन सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत बाजी मारली.
सोलापूर जिल्हा लॉन टेनिस संघटनेच्या (एसडीएलटीए) वतीने, अखिल भारतीय लॉन टेनिस संघटना (एआयटीए) आणि महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेच्या (एमएसएलटीए) मान्यतेने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
पहिल्या पात्रता फेरीत नवव्या मानांकित राघव जयसिंघानीने आदित्य कोठारीचा ६-१, ६-३ असा पराभव केला. पाचव्या मानांकित उदित कंबोजने प्रज्वल तिवारीला ६-१, ६-४ असे नमवले. तेराव्या मानांकित संदेश कुरळेने दीप मुनीमविरुद्ध ६-४, ४-६, १०-७ असा संघर्षपूर्ण विजय मिळवला. बाराव्या मानांकित काहीर वारिकने ओगेस थेजो जया प्रकाशचा ६-१, ६-३ असा पराभव केला. पात्रता फेरीतील अंतिम सामने सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत खेळवले जातील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.